पालखी साेहळ्यासाठी चार हजार पाेलिसांचा बंदाेबस्त

    21-Jun-2022
Total Views |
 

Police 
माऊली आणि तुकाेबांच्या पालख्यांचे उद्या पुण्यात स्वागत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पालखी साेहळ्यानिमित्त शहरात चार हजार पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात येणार आहे. पालखी साेहळ्यानिमित्त पाेलिसांनी बंदाेबस्ताची आखणी केली असून, शहरात पालख्यांचे आगमन बुधवारी (22 जून) हाेणार आहे.काेराेनामुळे गेली दाेन वर्षे पालखी साेहळ्याची परंपरा खंडित झाली हाेती. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी साेहळ्याने श्री क्षेत्र देहूतू साेमवारी प्रस्थान ठेवले असून, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी साेहळा श्री क्षेत्र आळंदीतून मंगळवारी (21 जून) पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे.
 
दाेन्ही पालख्यांचे पुणे शहरात बुधवारी (22 जून) सायंकाळी आगमन हाेणार आहे. 23 जूनला पालखी साेहळे शहरात मु्नकामी राहणार असून, 24 जूनला ते प्रस्थान ठेवणार आहेत.पालखी साेहळ्यासाठी शहरात चार हजार पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात येणार आहे. पाेलिसांच्या विशेष शाखेकडून बंदाेबस्ताची आखणी करण्यात आली आहे.पालखी साेहळ्यात साध्या वेशातील पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हे शाखेची पथके बंदाेबस्तात राहणार आहेत. राज्य राखीव पाेलिस दलाची तुकडी, तसेच गृहरक्षक दलाचे 600 जवान बंदाेबस्तास असतील.