अवेळी केस पांढरे हाेण्याची समस्या

    21-Jun-2022
Total Views |
 
 
 

Hairs 
तरुणांमध्ये चुकीच्या आहारामुळे केस पांढरे हाेण्याची समस्या दिसून येते. हानिकारक रसायनयुक्त शॅम्पू, जेल इत्यादीच्या वापरामुळे केस पांढरे हाेतात.केसांना वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर कलरचा वापर हे अवेळी केस पांढरे हाेण्याचं मुख्य कारण आहे.
हेअर कलर्समध्ये असणारी हानिकारक रसायनं केसांच्या पांढरेपणाला आमंत्रण देतात. तसंच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केसांवर वेगवेगळे प्रयाेग करणे, त्यामध्ये असलेली रसायनं केसांच्या समस्यांना आणि शुष्कतेला आमंत्रण देतात. अवेळी केस पांढरे हाेऊ नयेत यासाठी पाेषणयुक्त आहार आणि केमिकलरहित आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर करायला हवा. आपला जाे पारंपरिक आहार आहे, म्हणजे भाजी, पाेळी, वरण, भात, काेशिंबीर, फळं हा एक संपूर्ण आहार आहे. पाश्चिमात्य संस्μकृतीचं अनुसरण न करता, आपल्या भारतीय आहाराचं सेवन करा.