दक्षिण काेरियामध्ये हरवलेल्या जुळ्याचा डीएनए नमुना घेऊन शाेध एकमेकांपासून दूर वेगवेगळ्या देशांमध्ये वाढलेल्या जुळ्या मुलांमध्ये वातावरण आणि संस्कृतीची गहनता यांचा परिणाम हाेताे. इतकंच नाही, तर वेगळ्या वातावरणात राहिल्यानंतर त्यांना कुटुंबासाेबत एकटेपण जाणवतं. जीवन जगण्यासाठी अधिक संघर्ष आणि कमी स्वातंत्र्य, त्यांच्या मानसिक आराेग्यामध्ये देखील फरक पडताे. तथापि, त्यांची आयक्यू (खट) पातळी 80 ट्नकयांपर्यंत समान आहे आणि अनुवांशिक भिन्नता देखील समान आहे.
सन 2020 मध्ये दक्षिण काेरियामध्ये हरवलेल्या मुलांचा शाेध घेण्यासाठी एक कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. यामध्ये डीएनए नमुन्यांद्वारे मुलांचा शाेध घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 45 वर्षांपूर्वी विभ्नत झालेली जुळी मुले एकमेकांना भेटली.
संशाेधकांनी दाेन्ही जुळ्या मुलांमधील बदलांचा अभ्यास केला. वास्तविक, दक्षिण काेरियामध्ये सन 1974 मध्ये एका कुटुंबात जुळ्या मुलांचा जन्म झाला हाेता. वयाच्या दुसऱ्या वर्षी ही जुळी मुलं एका बाजारात हरवली.त्यानंतर हरवलेल्या जुळ्याला कुटुंबाच्या घरापासून 100 मीटर दूर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. त्याल अमेरिकेतील एका कुटुंबाने दत्तक घेतले हाेते.संशाेधकांच्या मते, दाेघांमध्ये अनेक समानता असूनही, मानसिक आराेग्य आणि नाेकरीतील समाधानाच्या बाबतीत दाेघेही भिन्न हाेते. दक्षिण काेरियामध्ये घरी वाढलेल्या मुलामध्ये तर्कश्नती जास्त हाेती. त्याच वेळी, अमेरिकेत वाढलेल्या मुलाला प्राैढ हाेईपर्यंत फिट्स (फेफरे) येऊ लागले. त्याचवेळी बिघडलेल्या मानसिक आराेग्यामुळे ताे एक वेगळ्या प्रकारचा माणूस बनला हाेता.