घरखर्चाचे बजेट सांभाळण्यासाठी अनावश्यक खर्च टाळा

    21-Jun-2022
Total Views |
 
 
 
 
गरज आणि चैनीतील फरक समजून घ्या आणि विवेकाने खर्च करा
 

Budget 
 
संध्यानंद.काॅम
 
काळ कसाही असला, तरी आव्हानांपासून पळून जाणे हा मार्ग नसताे. आपल्या सवयींमध्ये बदल केला, तर काेणत्याही स्थितीत टिकून राहणे श्नय असते. सध्याचा महागाईचा काळ पाहता, अनावश्यक खर्च पूर्ण टाळणे आवश्यक आहे. स्थिर उत्पन्न आणि चढे दर या स्थितीत हाती असलेला प्रत्येक रुपया दक्षतेने वापरायला हवा आणि उत्पन्नाचे अन्य मार्गसुद्धा शाेधायला हवेत. अर्थतज्ज्ञांचा सल्ला काय आहे ते बघा.वाढत्या महागाईमुळे अनेक कुटुंबांमध्ये सध्याच्या काळात खरेदी आणि खर्चाच्या सवयींत बदल झाल्याचे दिसते. त्यांनी हे बदल कसे केले ते पाहा.
 
गरज आणि चैन यात अंतर गुरुग्राममधील 31 वर्षांच्या अपेक्षा ह्या मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करतात. त्या म्हणतात, ‘पूर्वी मला आवडलेली काेणतीही वस्तू मी खरेदी करत असे. आता मात्र त्या वस्तूची खराेखर गरज आहे का केवळ माझी इच्छा आहे याचा विचार मी करते.दहा मिनिटे विचार केल्याशिवाय मी काहीही खरेदी करत नाही.त्यातून माझी अनावश्यक खर्चाची सवय गेली. आतासुद्धा ऑनलाइन शाॅपिंग करताना मी दाेन-तीन वेबसाइट्स पाहून, दरांची तुलना करून खरेदी करते. गरज आणि चैन यांच्यातील फरक मला समजला आहे.’ ऑनलाइन सवलतींचा लाभ : कानपूरच्या सरिता शर्मा या गृहिणीने घरखर्चाचे बजेट सांभाळण्यासाठी ऑनलाइन खरेदीवर मिळणाऱ्या सवलतींकडे लक्ष ठेवण्याचा पर्याय स्वीकारला आहे.
 
काेणत्या वस्तूवर किती सवलत आहे हे पाहून त्या खरेदी करतात. काही वेळा एका वस्तूवर दुसरी वस्तू माेफत मिळत असल्याने पैसे वाचतात. ऑनलाइन शाॅपिंगमध्ये रिवाॅर्ड्सही मिळून त्यांचा फायदा हाेताे. कार्डाद्वारे केलेल्या पेमेंटमुळे कॅशबॅकसुद्धा मिळते. या मार्गांनी त्या बरेच पैसे वाचवितात.नव्या संधींचा शाेध : आपल्या काैशल्यातूनसुद्धा पैसे मिळविता येत असल्याचे पाटण्याच्या रहिवासी कंचन सिन्हा यांनी सांगितले. महागाईच्या काळात घरखर्चाला हातभार लावण्यासाठी त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत ऑनलाइन ट्यूशन्स घेणे सुरू केले असून, त्यातून त्यांना चांगली आर्थिक कमाई हाेते.साध्या उपायातून बचत : दिल्लीतील नजफगड विभागातील छाेले-भटुरे विक्रेते विनाेद चाैधरी यांच्या व्यवसायालाही महागाईची झळ बसली आहे.
 
पण छाेले-भटुऱ्याच्या प्लेटची किंमत वाढविली तर ग्राहक पाठ फिरवितील हे नक्की असल्यामुळे त्यांनी दरवाढ न करता प्लेटमधील छाेल्यांचे प्रमाण कमी केले. त्यामुळे त्यांचा खर्च कमी हाेऊन बचत झाली.ऑनलाइनमुळे घरभाडे वाचले : बिहारमधील हाजीपूरचे रहिवासी आशुताेष पांडे यांची दाेन्ही मुले दिल्लीत राहून अभियांत्रिकीच्या परीक्षेची तयारी करत हाेती. लाॅकडाऊनच्या काळात ती घरी आली आणि आता तेथेच राहून ऑनलाइन ्नलासद्वारे अभ्यास करत आहेत.त्यामुळे त्यांचा दिल्लीतील राहण्या-जेवण्याचा खर्च वाचला.ऑनलाइन ्नलासची फीसुद्धा कमी असल्याने तेथे बचत झाली आहे. आशुताेष पांडे यांच्या पत्नी मंजू यांना खरेदीचा छंद आहे आणि त्यावर त्या नियंत्रण ठेवू शकत नाहीत. पण आता त्या बाजारात जात नाहीत. पती आणि मुलांनाच खरेदीची यादी त्या देतात. या मार्गाने त्यांनी अनावश्यक खर्चाला आळा घातला आहे.