हवाई दलात भरती प्रक्रियेला 24 जूनपासून हाेणार सुरुवात

    20-Jun-2022
Total Views |
 
 

army 
लष्करातील ‘अग्निपथ’ या नव्या भरती याेजनेंतर्गत हवाई दलातील भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरू हाेणार आहे, अशी माहिती एअर चीफ मार्शल व्ही. आर.चाैधरी यांनी दिली.केंद्राने ‘अग्निपथ’ याेजना जाहीर केली आहे. या याेजनेत भरतीचे वय 17.5 वर्षे ते 21 वर्षे ठेवण्यात आले आहे. पहिल्या भरतीसाठी तरुणांची कमाल वयाेमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे. माेठ्या संख्येने तरुण या भरतीसाठी अर्ज करतील, असा विश्वास एअर चीफ मार्शल चाैधरी यांनी व्य्नत केला, तसेच येत्या 24 जूनपासून हवाई दलात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अग्निपथ याेजनेत वयाेमर्यादा 21 वरून 23 वर्षे करण्याच्या निर्णयामुळे लष्करात भरती हाेण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना संधी मिळणार आहे. इच्छुक तरुणांनी ‘अग्निपथ’ म्हणून लष्करी सेवेत रुजू हाेण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन लष्करप्रमुख जनरल मनाेज पांडे यांनी केले आहे.