कामावर मन एकाग्र करा

    20-Jun-2022
Total Views |
 

Success 
 
स्वामी विवेकानंद म्हणतात की, एकाग्र मन हे एखाद्या दिव्याप्रमाणे आहे. त्यामुळे आपल्याला कानाकाेपऱ्यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते. याेगिजन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करून घेतात.याेगिजनांसाठी हे साध्य असते. त्याचप्रमाणे आपणही ज्या बाबीत आपल्याला यश मिळवायचे आहे हे आधी ठरवावे. त्यानुसार त्या कामावर मन एकाग्र करावे. मग ही कामे याेग्य रितीने निश्चित पार पडतील. काेणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची गरज असते. एखादा लाेहार, सुतार, साेनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणविताे.कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात हाेऊन नुकसान हाेण्याची शक्यता असते. एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लाेक काेणतीही पुस्तके वाचत नाहीत वा काेणत्या याेगशिबिरातही जात नाहीत. सरावाने आपाेआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते.
 
उदा. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल, तर साध्या साध्या कामांमध्येही चुका हाेऊ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जाेखमीची अवघड कामेदेखील अचूक हाेऊन जातात.मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे काेणते? मनाची चंचलता ही सर्वांत माेठी अडचण आहे. मन माेठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वाऱ्याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास व वैराग्य यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते, असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसाेपे नाही, तसे अशक्यही नाही. आयुष्यात काेणत्याही गाेष्टीत असाधारण यश प्राप्त करून घ्यायचे असेल, तर मनाच्या एकाग्रतेला पर्याय नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रति आपली अविचल श्रद्धा पाहिजे. ती गाेष्ट प्राप्त करून घेण्याची अपरिहार्यता मनाने स्वीकारली पाहिजे.इतर अनेक पूरक गाेष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.