जगातील सर्वांत लांब काचेचा पूल

    20-Jun-2022
Total Views |
 
 
 
 
Bridge
 
व्हिएतनाममध्ये पायी जाणाऱ्या लाेकांसाठी हा जगातील सर्वांत लांब आणि उंच काचेचा बारवलांग पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला व्हाईट ड्रॅगन असे नाव देण्यात आले आहे. हा पूल 2,073 फूट (632 मीटर) लांब असून, एका घनदाट जंगलात 150 मीटर (492 फूट) उंच आहे. या पुलाची फरशी फ्रेंच टेंपर्ड ग्लासची आहे. हा पूल 450 लाेकांचे वजन सहन करू शकताे. व्हिएतनाममधील काचेचा हा तिसरा पूल आहे. या पुलाची नुकतीच गिनीज बुकात नाेंद झाली आहे. यापूर्वी चीनमधील ग्वांगडाेंग येथील काचेचा पूल 526 मीटर लांब हाेता.