‘निमा’च्या मागण्यांबाबत सकारात्मक : टाेपे

    18-Jun-2022
Total Views |

Tope
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असाेसिएशनच्या (निमा) मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी येथे दिली.निमाच्या मागण्यांबाबत टाेपे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीस आराेग्य विभागाचे आयुक्त डाॅ. रामास्वामी एन., अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, आराेग्य विभागाचे उपसचिव विजय लहाने, ईएसआयसीचे संचालक डाॅ. संजय ढवळे, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले, सहसंचालक संजय सरवदे आदी उपस्थित हाेते. निमाच्या वतीने डाॅ. सत्यजित पाटील यांनी मागण्यांचे निवेदन टाेपे यांना दिले. त्यावर वेतनवाढ, भरती प्रक्रिया, मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टमधील नाेंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती प्रक्रियेत बीएएमएस पदवीधर नियुक्ती करण्यात यावी या मागण्यांबाबत आराेग्य विभाग, परिवहन विभाग आणि नगर विकास विभागाच्या वतीने संयुक्त प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना टाेपे यांनी दिल्या. निमाचे सचिव डाॅ. अभय तांबिले, डाॅ.राजेंद्र खटावकर यांनी म्हणणे मांडले.