धूसर दिसणाऱ्या मुलांनी चष्मा न घातल्यास डाेळ्यांवर पडताे ताण

18 Jun 2022 15:35:28

Eyes
जगभरात पंधरा वर्षांखालील वयाच्या 1 काेटी 20 लाखांपेक्षा जास्त मुलांमध्ये एक समस्या समान आहे.ही आहे रिफ्रे्निटव्ह एररमध्ये सुधारणा न केल्यामुळे धूसर दिसणे.याचा उपाय अत्यंत साेपा आहे. बहुतेक प्रकरणांत चष्मा या समस्येवर उपचार आहे. समस्या ही आहे की, बहुतेक प्रकरणांत मुलांच्या डाेळ्यांची समस्याच समजत नाही.चष्मा न घालण्याचा परिणाम: मुले 80 टक्के गाेष्टी पाहून शिकत असतात. मुलांना जेव्हा स्पष्ट दिसेनासे हाेते तेव्हा शिकण्याची त्यांची याेग्यता प्रभावित हाेत असते. शिक्षणात त्यांचा परफाॅर्मन्स प्रभावित हाेऊ लागताे.त्यांच्या डाेळ्यांवर ताण पडताे.एखादी गाेष्ट पाहण्यासाठी डाेळ्यांना जास्त ताकद लावावी लागते. यामुळे डाेकेदुखी, डाेळ्यांना शीण व डाेळ्यांत पाणी येण्यासारख्या समस्या संभवतात.
 
सुरुवातीला उपचार आवश्यक: चष्मा लावल्यामुळे मुलांना वस्तू वा लिहिलेल्या मजकुरावर लक्ष देण्यास मदत मिळते. यामुळे मुलांना स्पष्ट पाहायला मदत हाेते.डाेळ्यांच्या कमकुवतपणाचा संकेत : मुलांना बहुधा स्वत:च्या डाेळ्यांच्या कमजाेरीविषयी समजू शकत नाही, त्यामुळे ते आई-वडिलांना याविषयी सांगत नसतात. तसे काही लक्षणे पाहून मुलांना डाेळ्यांनी न दिसण्याच्या समस्येचा अंदाज लावता येऊ शकताे. अशी मुले वाचताना पुस्तक आपल्या डाेळ्यांच्या खूप जवळ धरतात. वाचताना वारंवार अनेक चुका करतात. वर्गांत आपल्या सीटवरून ब्लॅकबाेर्डसुद्धा स्पष्टपणे पाहू शकत नाहीत. प्रखर प्रकाशापासून डाेळे वाचवण्याचा प्रयत्न करतात. वा दूरच्या वस्तू पाहण्यासाठी त्यांना डाेळे बारीक करावे लागतात.
Powered By Sangraha 9.0