आजकाल प्रत्येक ऑिफसात काॅम्प्युटर आला आहे. काॅम्प्युटरवर काम करताना डाेळ्यांना त्रास हाेत असल्याचे आपल्यालाही जाणवले असेल. तासन्तास काॅम्प्युटरकडे पाहत काम करणे मानसिक थकवा निर्माण करीत असते. काम करणारी जागा आपल्याला दमवणारी असू नये यासाठी काय करावे ते पाहू या.आपण जेथे बसून काम करता ती जागा माेकळी आणि हवेशीर असावी.आपण जी खुर्ची वापरता ती अॅडजस्टेबल असावी.जर काॅम्प्युटरवर सतत काम करीत असाल तर दर 40 मिनिटांनंतर कीबाेर्ड आणि माॅनिटरवरून ब्रेक घ्यावा आणि दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे लक्ष द्यावे. त्यामुळे डाेळ्यांच्या स्नायूंना आराम मिळेल.
माॅनिटर आपल्या डाेळ्यांच्या सरळ रेषेत असेल एवढी त्याची उंची असावी.काॅम्प्युटरच्या टेबलावर एखाद्या अॅडजस्टेबल टेबललॅम्पचा वापर करावा. त्याच्या बल्बचा प्रकाश डाेळ्यांसाठी खुपणारा नसावा.आपले हात की बाेर्डावर सरळ राहतील अशा स्थितीत बसावे. हातांच्या वरच्या आणि पुढच्या भागात 70 ते 90 अंशाचा काेन करावा.आपल्या बसण्याची पद्घत, खुर्चीची याेग्य स्थिती आणि स्क्रीनचा याेग्य अँगल असेल तर पाठदुखी आणि इतर त्रासांपासून आपण दूर राहू शकता.काॅम्प्युटरसमाेर जास्त काळ बसून काम करू नये. अधूनमधून खुर्चीतून उठून इकडेतिकडे िफरावे. यामुळे थकवा कमी हाेऊन काम करण्यास पुन्हा हुरूप येईल