धगधगत्या ज्वालामुखीच्या जागी हिरवीगार शेती

    17-Jun-2022
Total Views |
 
 

Volcano 
 
70 वर्षांत बेट पिकांनी समृद्ध : पाेर्तुगालमधील दुर्गम भागात असलेल्या अजाेरस बेटांच्या समूहामधील साओजाॅर्ज बेटाचे हे छायाचित्र आहे. मध्य अटलांटिकमधील हा बेटांचा समूह 70 वर्षांपूर्वी ‘धगधगता ज्वालामुखी’ हाेता. या ज्वालामुखीतून लाव्हारसाची नदी वाहत हाेती. ज्वालामुखी सुप्त झाल्यावर येथे हिरवीगार 9 बेटे तयार झाली. ज्वालामुखीचे खड्डे तलाव बनले आहेत. हा बेटांचा समूह ‘स्वायत्त क्षेत्र’ आहे. जाे पाेर्तुगालच्या दुसऱ्या बाजूला आहे. 1950 पासून लाेक या बेटावर राहायला आले आहेत. आज या 9 बेटांवर 50 हजारपेक्षा जास्त लाेक राहतात.
 
याशिवाय माेठ्या संख्येने पर्यटक येतात. हे बेट इंग्लंडपासून जवळ आहे. या बेटांपर्यंत इंग्लंडमधून विमानाद्वारे जाता येते. पाेर्तुगालपासून ही बेटे 1 हजार मैल दूर असून, अमेरिकेच्या बाेस्टन शहरापासून या बेटावर येण्यास 5 तास लागतात. पर्यटकांची वाढती संख्या पाहून लंडनची एक एअरलाइन्स कंपनी लवकरच या बेटांसाठी फ्लाइट सुरू करणार आहे. वाकड्या तिकड्या काळ्या वाळूने (ज्वालामुखीची राख) किनारे झाकले गेले आहेत. या बेटांवरील रहिवासी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. या बेटांवर घाेडागाडी हेच एकमेव वाहन आहे.