हिमाचल प्रदेशातील मनाली येथे पहिले व देशातील तिसरे फ्लाईंग डायनिंग रेस्टाॅरंट सुरू झाले आहे. येथे पर्यटक 170 फूट उंचीवर जेवण करता करता मनालीचे निसर्गरम्य दृश्य पाहू शकतात. या रेस्टाॅरंटचे मालक दमन कपूर यांनी सांगितले की, पर्यटनाला प्राेत्साहन देण्याच्या दृष्टीनेच 2 हजार 250 मीटर उंचीवर हे अधांतरी रेस्टाॅरंट 9 काेटी रु. खर्च करून सुरू केले आहे. या फ्लाईंग डायनिंगमध्ये जेवणाच्या वेळी 24 लाेक बसू शकतात. यासाठी प्रतिव्य्नती 3 हजार 999 रु. खर्च करावा लागेल.