किडनी स्टाेन झाला असल्यास घरगुती उपचार करणे शक्य
17-Jun-2022
Total Views |
- आंब्याचं ताजं पान सावलीत सुकवून त्याची पावडर करा. पाण्याबराेबर आठ ग्रॅम पावडरचं नियमित सेवन करा.
- सफरचंदाचा रस पित राहण्याने स्टाेन बनणे थांबते आणि असलेला स्टाेन विरघळून लघवीमार्गे बाहेर पडताे.
- आवळ्याचं चूर्ण मुळ्याबराेबर खाण्याने मूत्राशयात स्टाेन असल्यास ायदा हाेताे.
- जांभळाच्या बीचं चूर्ण दह्याबराेबर खाण्याने स्टाेन सहज विरघळताे.
- नारळाचं पाणी पित राहण्याने स्टाेनच्या वेदनांमध्ये आराम मिळताे.
- बीटाचा रस 30 ग्रॅम दिवसातून चार वेळा पिण्याने स्टाेन विरघळून जाताे.
- कांद्याच्या रसात साखर मिसळून सरबत पिण्याने स्टाेन बाहेर पडताे.
- सहा ग्रॅम ओवा खाण्याने स्टाेन गळून पडताे.
- अर्धा लिटर पाण्यात 35 ग्रॅम मुळ्याच्या बिया उकळवा. जेव्हा पाणी अर्धं हाेईल तेव्हा गाळून घ्या. काही दिवस हे पाणी पिण्याने मूत्राशयातील स्टाेन निघून जाताे.
- मुळ्याची पानं चावून चावून खाण्याने स्टाेनचे तुकडे तुकडे हाेऊन ताे लघवीमार्गे निघून जाताे.
- सहा ग्रॅम मेंदीची पानं अर्धा लिटर पाण्यात उकळवा. जेव्हा पाणी 150 मिलि. राहील तेव्हा गाळून हे पाणी गरम गरम प्या. यामुळे किडनीचे आजार दूर हाेतात.
- अक्राेड साल आणि बीसहित कुटून हे चूर्ण एक चमचा सकाळ-संध्याकाळ खाण्याने स्टाेन ठिक हाेताे.
- सहा ग्रॅम कडुलिंबाच्या पानांची राख थंड पाण्याबराेबर दिवसातून तीन वेळा प्या. काही दिवसांतच स्टाेन निघून जाईल.