एव्हरेस्टवीर सविता कंसवालचे राज्यपाल काेश्यारी यांनी केले अभिनंदन

    16-Jun-2022
Total Views |
 
 
 
 

Governor 
 
मूळच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील लाेंथरू गावच्या गिर्याराेहक सविता कंसवाल यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट, तसेच पाचवे उंच शिखर माउंट मकालू यशस्वीरीत्या सर केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी त्यांचे अभिनंदन करत काैतुकाची थाप दिली.पंचवीस वर्षांच्या सविता कंसवाल यांनी 12 मे राेजी माऊंट एव्हरेस्ट, तर 28 मे राेजी मकालू शिखर सर केले. अशा प्रकारे अवघ्या साेळा दिवसांच्या फरकाने दाेन माेठी गिरिशिखरे सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला गिर्याराेहक ठरल्या आहेत. सविता कंसवाल यांनी राज्यपालांची राजभवनात नुकतीच सदिच्छा भेट घेऊन आपल्या विक्रमाची माहिती दिली. या यशाबद्दल राज्यपालांनी कविता कंसवाल यांचे अभिनंदन केले.