मनाची मशागत करून सकारात्मक विचार पेरा

11 Jun 2022 20:22:40
 
 
संध्यानंद.काॅम
 

stress 
 
जगात अनेक घटनांचा उलगडा झाला असला, तरी मनाचा पूर्ण थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. प्रत्यक्ष दिसत नसले, तरी ते आहे आणि आपण त्याच्या आधारेच चालताे आहाेत हेच सत्य. मन म्हणजे काय याबाबत तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ शाेध घेत असले, तरी ते पूर्णपणे कळालेले नाही. असे म्हणतात की मन म्हणजे जमीन आहे, चेतना तिचा बागवान आणि आपले विचार म्हणजे बीज. मनाच्या या जमिनीवर कळत-नकळत अनेक प्रकारची बिजे पडत असली, तरी चेतना ज्यांची मशागत करते तीच बिजे वाढतात. म्हणजे आपले विचार निर्माण हाेतात. मन कितीही बलिष्ठ असले, तरी त्याला स्वत:हून चालता येत नाही. आपण आपल्या विचारांना देत असलेल्या चालनेमुळे ते कार्यरत हाेते.
 
तिक न्यात हन्ह या व्हिएतनामीबाैद्ध धर्मगुरूंचे वयाच्या 95व्या वर्षी नुकतेच निधन झाले.मनाबाबतच्या अनेक गूढ गाेष्टी त्यांनी साेप्या भाषेत सांगितल्या आहेत. ते म्हणतात, ‘आपले चेतन मन ज्या बिजांना पाणी देण्यासाठी निवडते, तीच बिजे नंतर माेठी हाेऊन आपले बाेलणे आणि वर्तनाच्या रूपाने सामाेरी येतात. चांगला माळी नेहमी याेग्य बिजे निवडताे. आपल्या मनाच्या जमिनीवर आपण दया, करुणा, प्रेम, मेहनत, सहकार्य, विश्वास, आनंद आणि समृद्धीची बिजे जमा करण्याची आवश्यकता आहे.’ जीवनात अनेक अनुभव येत असतात. कधी चांगले, तर कधी वाईट. लाेकांना आलेल्या अनुभवांतूनसुद्धा आपण खूप काही धडे घेत असताे; पण आपण भूतकाळातील कटू आठवणींमध्ये अडकून पडलाे, तर आपल्या बाेलण्यात दु:ख, नैराश्य, औदासीन्य, वाद, जबाबदाऱ्या टाळून पळ काढणे, बेछूट वागणे आणि दुसऱ्यांचे पाय ओढण्यासारखी लक्षणे दिसायला लागतात.
 
मनातील बिजांच्या निवडीबराेबर आवडी जुळत असलेल्या लाेकांबराेबर आपले जमते; पण निरर्थक आणि वाईट विचारांची बिजे पेरल्यास फायदे कमी आणि ताेटे जास्त अशी स्थिती येते.बागेच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ुले-फळे कमी आणि तण जास्त असे हाेते.चांगले विचार मनात राहावेत म्हणून काय करावे, असा प्रश्न आता येताे. मनाच्या जमिनीवर चांगली बिजे पेरल्यास फळेही उत्तम मिळतील हे लक्षात घ्या. सदैव सजग राहणे (माइंडफूलनेस) आणि वर्तमानात (आज) जगण्यावर सगळे आध्यात्मिक गुरू भर देतात. मनातील आणि बाह्य जगसुद्धा सुंदर हाेण्यासाठी आपला फाेकस, एकाग्रता याेग्य त्या ठिकाणी केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मानसशास्त्रज्ञ सांगतात. आपल्याला समाधानी जीवन हवे असल्याचे ठरवून त्यानुसार चेतन मनरूपी बागावानाला तशी बिजे लावण्यास तुम्ही तयार करू शकता.
 
आपल्या आजूबाजूला खाेटेपणा, संशय, नैराश्य, असमाधान, बेचैनी आणि स्पर्धेचे वातावरण असल्यास तुम्ही चांगल्या बिजांचे राेपण करा. तुमचे लक्ष सकारात्मक विचारांवर ठेवा. ‘सायकाॅलाॅजी टुडे’मधील लेखात लेखिका जाॅर्डेना ब्लरनेट म्हणतात, ‘प्रत्येक विचार एखाद्या बिजाप्रमाणे आहे आणि त्याच्यात आपले जीवन प्रत्यक्षात आणण्याची क्षमता असते. प्रत्येक विचाराच्या विरुद्ध एक विचार असल्यामुळे आपल्याला काय हवे आहे, याच विचार आपणच करायला हवा.’ मेहनती आणि सृजनशील विचारांच्या लाेकांच्या सहवासात राहण्याचा आपल्यावर अनुकूल परिणाम हाेताे.आपले लक्ष आपल्या कामावर एकाग्र हाेते. त्यातून आपल्यातील आळस आणि कामात अडथळे आणणाऱ्या विचारांपासून आपण आपाेआपच दूर हाेऊ लागताे. प्रेम आणि कारुण्याला प्राधान्य दिल्यास स्वार्थीपणा आणि आपमतलबी वृत्ती संपते. चेतना समाधानी असेल, तर आळस आणि औदासीन्य आपल्याजवळ फिरकत नाही आणि जीवन सुलभ हाेते.
 
शरीर आणि मनाच्या आराेग्यावर लक्ष केंद्रित करण्यामुळे आपण हानिकारक सवयींपासून दूर हाेऊ लागताे; पण याचा अर्थ दु:ख किंवा औदासीन्याकडे लक्ष न देणे असा नाही. त्यातून लवकर बाहेर येण्याचा प्रयत्न करणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच अशा भावनांमध्ये फार काळ न गुंतणे.आधुनिक आध्यात्मिक गुरू ए्नहार्ट टाेल म्हणतात, ‘केवळ बीज आणि पाकळ्यांमुळे फूल तयार हाेत नाही. त्याच्या निर्मितीत माती, खते, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाशाचाही सहभाग असताे.’ हेच आपल्या आयुष्याबाबत सुद्धा असते.सुखामागे दु:ख आणि दु:खानंतर सुख असे चक्र चालूच असते. आपण कशाचा किती विचार करताे, यावर आपली ऊर्जेची पातळी निश्चित हाेते.
Powered By Sangraha 9.0