हिंद विजय पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुधाकर देशमुख; सचिवपदी कैलास भेगडे

    11-Jun-2022
Total Views |
 
sudahkar
 
 
सुधाकर देशमुख
अध्यक्ष 
 
तळेगाव दाभाडे, 10 जून, (आ.प्र.) :
 
येथील हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुधाकर देशमुख यांची बिनविरोध; तर सचिवपदी कैलास भेगडे यांची फेरनिवड झाली आहे. उपाध्यक्षपदी संजय वांद्रे, खजिनदारपदी विभावरी दाभाडे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे आणि सचिन भिडे यांनी कामकाज पाहिले.
 
sudahkar
 
 
कैलास भेगडे, सचिव
 
 
या वेळी पतसंस्थेचे संस्थापक ॲड. रवींद्र दाभाडे, व्यवस्थापक दत्तात्रय कांदळकर आणि संचालक मंडळी उपस्थित होती. पतसंस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ` असून, मावळ तालुक्यात पाच शाखा आहेत. ॲड. दाभाडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उर्वरित कार्यकारिणी सदस्य या प्रमाणे : संचालक : पंढरीनाथ दाभाडे, नीलेश दाभाडे, प्रदीप गटे, विजय टाकवे, नीलेश मुऱ्हे, बिंद्रा गणात्रा, प्रकाश गायकवाड. तज्ज्ञ संचालक : देवराम वाघोले, ज्ञानेश्‍वर ठाकर. स्वीकृत संचालक : अंकुश आगरवाल, गणेश धानिवले, नामदेव आंद्रे