पुणे परिमंडलातील 57 अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा गौरव

महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान

    06-May-2022
Total Views |
 
mseb
 
 
 
पुणे, 5 मे (आ.प्र.) :
 
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ व दोन्ही चक्रीवादळांच्या नैसर्गिक आपत्तीत महावितरणचे अभियंते व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठा, तसेच ग्राहकसेवेसाठी खडतर व आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे हे कार्य अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना काढले. सन 2021-22 मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या पुणे परिमंडलातील उत्कृष्ट 13 यंत्रचालक व 44 तांत्रिक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. रास्ता पेठेतील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात तालेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत, सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता भागवत थेटे, विजेंद्र मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन उत्कृष्ट 57 जनमित्रांना गौरवण्यात आले. पुणे परिमंडलातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी असे : गोपीनाथ शेळके, अनिल येवले, दत्तात्रय चव्हाण, मुरलीधर मुठे (बंडगार्डन विभाग), स्वप्निल जगदाळे, सतीश उंडे, एकनाथ साबळे, दिलीप चव्हाण (नगर रोड विभाग), तानाजी शेंडकर, किशोर मस्के, उमेश मिसाळ, गणेश बिडवे, (पद्मावती विभाग), पंडित शिंदे, सत्यवान दराडे, सोनाली वेिशकर्मा, चेतन जाधव (पर्वती विभाग), इरफान मोहम्मद, अजित हांडे, सोमिनाथ कळम, विजय भोसले, राहुल आरुडे (रास्ता पेठ विभाग), सुभाष जुंबळे, सिद्धांत गणोरकर, ज्ञानेेशर मते, कृष्णा आरुडे (भोसरी विभाग), शिल्पा जाधव, अंकुश खुडे, श्रीनिवास दौंड, एकनाथ भाकडे (कोथरूड विभाग), अमीर देवर्षी, राहुल चव्हाण, सुरेश पाटोरकर, बद्रिनाथ जाधव (पिंपरी विभाग), अनिल फाळके, सुनील शेळके, सुदर्शन मुंडे, सिद्धेश घुले, (शिवाजीनगर विभाग), सोमनाथ चव्हाण (गणेशखिंड चाचणी), बंडू नांगरे, अमित महाजन, बाळकू कवटे, राजेश आव्हाड, शिवाजी वाघमारे, शिवाजी लोहकरे (मंचर विभाग), उमेश खोमणे, कैलास सरोगदे, सचिन जावळकर, राजेंद्र खरात, संपत चौधरी (मुळशी विभाग), सोमनाथ जंगले, अमृता चौधरी, अवधूत गिरी, रामकृष्ण मांजरे, दिनेश आगळमे, संभाजी येवले, महेश दरेकर (राजगुरुनगर विभाग).