कुंभ

    24-May-2022
Total Views |
 
 
Horoscope
 
या आठवड्यात तुमच्यासाठी सुखद आणि यशस्वी प्रवासाचे याेग आहेत. तात्पुरत्या समस्या व मतभेद सुटतील. व्यवसायानिमित्त केलेल्या प्रवासातून फायदा हाेईल.संततीच्या परीक्षेचा निकाल तुम्हाला निराश करू शकताे. अनपेक्षित प्रस्तावांमुळेही त्रास हाेण्याची श्नयता आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम असणार आहे. जर तुम्ही पुरेपूर तयारी केली असेल तर नक्कीच तुम्हाला यश लाभेल. जर एखाद्या सरकारी नाेकरीची तयारी करीत असाल तर तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे फळ मिळेल.कारभारात सध्या उन्नतीचा काळ आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात दांपत्य जीवन सुखमय राहील. भावा-बहिणींकडून साथ मिळेल. मित्रांसाेबत बाहेर जाण्याची याेजना असेल. मातृसुख लाभेल.नातलगांशी वाद हाेण्याची श्नयता आहे. तुम्ही स्वत:ला उत्तम बनवण्यासाठी साैंदर्य प्रसाधनांचा आधार घ्याल.
 
आराेग्य : या आठवड्यात काेणत्याही मुद्यावर मत मांडताना उत्तेजित हाेऊ नये.अतिरेकी विश्रांतीमुळे तुमच्या शरीरात शिथीलता व आळस राहील. सध्या तुम्ही आळस झटकून काम तसेच थाेडा व्यायाम करायला हवा. तसेच मांसाहार व जडान्न टाहावे. पालेभाज्या व रसाळ फळे खावीत.
 
शुभदिनांक : 23,24, 25
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात नवीन काम निवडत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
 
उपाय : या आठवड्यात गरीबांना ब्लँकेट, ब्राह्मणांना खिचडी व तीळगूळ दान केल्यास शुभफळ लाभेल