कन्या

    24-May-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात सकारात्मक विचारांनी तुम्ही जीवन व कामाला नवी दिशा द्याल.मनाेबल वाढत राहील. आपल्या माणसांना ओळखा व जीवन यशस्वी बनवा.चर्चा, विचार विनिमय, याेग्य परिणाम देतील. इतरांच्या कामावर टीका करू नका.अडलेला पैसा मिळेल. खर्च जास्त हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा विद्यार्थ्यासाठी मध्यम स्वरुपाचा असणार आहे. ऑफिस वा बिझनेसमध्ये स्त्री वर्गापासून सावध राहण्याची गरज आहे.अभ्यासाकडे ओढा राहील. उपजीविकेत लाभ हाेईल. कारभारातील अडसर दूर हाेतील. त्यामुळे आर्थिक लाभाचे याेग निर्माण हाेतील.
 
नातीगाेती : याआठवड्यात काैटुंबिक जीवन सुखमय असणार आहे. संततीच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. हसतमुख लाेकांच्या भेटीगाठी हाेतील. घरच्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात तुम्ही पूर्णपणे यशस्वी व्हाल. मित्रांसाेबत पार्टी वा सहलीचा आनंद लुटण्याचे नियाेजन कराल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.कारण काही गाेष्टी तुमच्या तब्बेतीला खूप हानिकारक ठरू शकतात. दक्षता बाळगावी, अनाराेगी जेवणाच्या सवयीपासून दूर राहावे. स्वत:च्या तब्बेतीबाबत बेपर्वा राहू नये. ऑफिसचा तणाव तब्बेत बिघडवू शकताे.
 
शुभदिनांक : 23, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात आव्हानात्मक, जाेखमीची कामे टाळा व पैशाबाबत चिंतन करा.
 
उपाय : या आठवड्यात भातात गूळ व दूध मिसळून खावे. यामुळे सूर्यदेव प्रसन्न हाेता