वृषभ

    24-May-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात बाेलण्यावर ताबा ठेवा. फालतू कामांसाठी खर्च हाेईल. सर्व याेजना अनुकूल हाेतील. वाहनादि दक्षतेने चालवा. व्यावहारिक संबंध सुधारतील.राज्यपक्षात अनुकूलता वाढेल. इतरांमुळे आपाेआप प्रगती हाेईल. व्यापारधंद्यात प्रगतीचे याेग आहेत. मित्र-नातलगांशी संबंध सुधारतील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात अद्याप बेराेजगारांना आणखी धावपळ करावी लागेल. प्राॅपर्टी व शेअर विकण्याबाबत सावध राहावे. तुमच्या याेग्यतेत वाढ हाेईल. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. शेतीद्वारे फायदा हाेईल. नाेकरदारांना अधिकाऱ्यांकडून अनुकूलता मिळेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही बाहेरच्या कामातील व्यस्ततेतूनही घरच्यांसाठी वेळ द्या. खास मित्रांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे तुम्ही मनाने मजबूत राहाल. तुमचे मानसिक त्रास तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसमवेत शेअर कराल.भावंडाशी असलेला वाद संपुष्टात येईल.
 
आराेग्य : या आठवड्यात तब्बेतीबाबत कसलाही बेफिकीरी करू नका. जुनाट राेगही वाढू शकतात. खाण्या-पिण्यात काळजी घ्यावी. आठवड्याच्या अखेरीस अ‍ॅसिडिटी हाेण्याची श्नयता आहे.अचानकपणे गुडघे दुखू लागतील. जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यामुळे पाेटाचे विकार संभवतात.
 
शुभदिनांक : 23, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात तुमची जुनी प्रेयसी तुमच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याची श्नयता आहे. याबाबत सावध असावे..
 
उपाय : या आठवड्यात तांब्याच्या लाेट्यात पाणी घेऊन घराच्या पूर्व भागात शिंपडून ताे भाग पवित्र करावा. यामुळे शुभसमाचार मिळेल.