वृश्चिक

    24-May-2022
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात आर्थिक व्यवहार सुटतील. भाग्यावर अवलंबून न राहता कामही करायला हवे. व्यापार-व्यवसाय लाभदायक राहणार आहे. त्याचा जास्त विस्तार करू नये. बेराेजगारांना राेजगार मिळेल. व्यापारात नवे साैदे मिळतील. कर्जासंधित समस्या सुटेल.
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी प्रगतिशील काळ आहे.
 
विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांवर विसंबून राहू नये व स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. नाेकरदारांसाठी धावपळीची स्थिती राहणार आहे. व्यापाऱ्यांनी धंद्यात सध्या माेठी गुंतवणूक करणे टाळावे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून मदत मिळणार ओ.भावा-बहिणींच्या भेटी हाेतील. पती-पत्नीत थाेडी कुरबूर हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे अनावश्यक त्रास करून घेणे याेग्य नव्हे. कुटुंबासाेबत आत्मीयतेचे संबंध राहणार आहेत.
 
आराेग्य : या आठवड्यात अंगदुखी, पाेटदुखी अशा आजारांबाबत सावध राहावे.मानसिक रुपात विशेष त्रास राहणार नाही. स्वत:च्या तब्बेतीबाबत निष्काळजी राहू नये. राेग झाल्यास आवश्यक औषध व उपचार अवश्य घ्यावेत. रागावू नये व मन शांत राखावे.
 
शुभदिनांक : 22, 26, 28
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात काही कामात अनुभवींचा सल्ला दुर्लक्षू नये कारण चुकीचा निर्णय घेऊन चिंताग्रस्त हाेऊ शकता.
 
उपाय : सकाळी लवकर उठून स्नानादि कामे उरकून सूर्याला अर्घ्य द्या. नंतर पूर्वे कडे ताेंड करून कुशासनावर बसून रुद्राक्ष माळेने ॐ सूर्याय नम: मंत्राचा जप करा.