धनू

    24-May-2022
Total Views |
 
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात नशिबावर अवलंबून न राहता कामही करायला हवे. व्यापारव्यवसायाचा जास्त पसारा घालू नये. वैयक्तिक वा व्यापारिक सुखद, यशस्वी प्रवासाचा याेग आहे. तात्कालिक समस्यांचे व मतभेदांचे निराकरण हाेईल. नातलगांना मदत करावी लागू शकते. उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात विद्यार्थी अपेक्षांवर खरे उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. नाेकरीत सतावणारी चिंता संपुष्टात येईल. इतरांनाही महत्त्व द्या व सर्वांना साेबत घेऊन काम पूर्ण करा. विद्यार्थी अभ्यासाबाबत दक्ष राहतील तर नक्कीच यशस्वी हाेतील.
 
नातीगाेती : या आठवड्यात दांपत्यसंबंधात गाेडवा टिकून राहील. अनावश्यक वादविवादापासून दूर राहावे. आई-वडिलांसाेबत प्रेमाचे संबंध राहतील. मित्रांसाेबत पिकनिक वा सिनेमाला जाण्याचा याेग आहे. नव्या व्यक्तींशी संबंध जाेडण्यापूर्वी त्यांच्याविषयी सर्व माहिती मिळवा.
 
आराेग्य : या आठवड्यात रस्ता ओलांडताना सावध राहावे. विशेषत: लाल दिवा ओलांडताना लक्ष ठेवावे. काेणा इतराची बेपर्वाई तुम्हाला दुखापत करून जाऊ शकते.त्वचेसंबधित समस्या त्रास देऊ शकतात. जुनाट आजारांपासून मु्नती मिळवण्यात यशस्वी व्हाल.
 
शुभदिनांक : 22, 26, 28
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात कुसंगत टाळावी अन्यथा आपल्या अभ्यासावर परिणाम हाेऊ शकताे.
 
उपाय : गूळ व गहू सूर्यदेवाला अर्पण करावा व नंतर गरजूंना वाटावा