मीन

    24-May-2022
Total Views |
 
 
 

Horoscope 
 
या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या मर्यादित उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च जास्त हाेण्याची श्नयता आहे. तुम्हाला भाग्याचा आधार मिळेल. काही नव्या माणसांसाेबत काम करण्याची संधी मिळेल आणि तुमची टीम वाढू शकते. तुमच्या पालकांकडे लक्ष द्यावे कारण त्यांना सध्या तुमची जास्त गरज आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात प्राेफेशनल माेर्चावर, विशेषकरून एखाद्याशी चर्चा, मीटिंग तसेच कम्युनिकेशन करताना थाेडी दक्षता घेण्याची गरज आहे. कामाकाजात थाेडा उशीर हाेईल पण तुम्ही केलेले काम जास्त बळकटी व स्थिरता आणणारे असणार आहे. उत्तरार्धात कामात प्रगती हाेईल.
 
नातीगाेती : तुम्ही काहीशा नकारात्मक विचारांत व कामकाजासंबंधित त्रासात अडकल्यामुळे नात्यांकडे कमी लक्ष देऊ शकाल. पण सायंकाळी तुमच्यात सकारात्मकता संचारेल. यानंतरची ग्रहस्थिती पाहता तुम्ही राेमँटिक मूडमध्ये जास्त मग्न असाल व अखेरच्या दाेन दिवसांत प्रेमसंबंधात खूप रमाल.
 
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीला तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यावे.विशेषकरून जागरण व मानसिक अस्वस्थता वाढण्याची श्नयता आहे. याशिवाय संपूर्ण पंधरवडा मूळव्याध, रक्ताभिसरणासंबंधित तक्रार पाेटाच्या उष्णतेची समस्या त्वचेत जळजळ व खाज सतावण्याची श्नयता आहे.
 
शुभदिनांक : 22, 26, 28
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात पार्टनरशिपमध्ये काम करीत असाल तर खूप सावध राहावे व पार्टनरवर डाेळे झाकून विश्वासू नये.
 
उपाय : या आठवड्यात मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गाेमातेला भाकरी खाऊ घालावी व पक्ष्यांना गहू घालावेत.