तूळ

    24-May-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात धर्मावरील श्रद्धा वाढेल. स्पर्धा तुमच्यासाठी हानिकारक ठरेल.पदाेन्नती हाेईल. मित्र व नातलग भेटल्यामुळे प्रसन्नता वाढेल. स्त्रीच्या सहमतीने लाभ हाेईल. सध्याचे क्षेत्र साेडण्याचा विचार हानिकारक ठरेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात विद्यार्थ्यांनी कठाेर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा विपरित निकाल लागू शकताे. नाेकरदारांत दगदगीची स्थिती राहणार आहे. कारभारात उन्नती हाेईल. व्यापारात आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. भागीदारीत जाेडीदारावर विसंबून राहू नये.
 
नातीगाेती : या आठवड्यात घरात एखादा नातेवाईक आल्यामुळे प्रसन्नता राहणार आहे. आपल्या दांपत्य जीवनात सुख व प्रेम वाढेल. तुम्हाला कुटुंबीयांचे प्रेम आणि कृपा लाभेल. नवे संबंध जाेडले जातील. प्रेम प्रकरणात माधुर्य टिकून राहील. मित्रांसाेबत मनाेरंजनाच्या वातावरणात वेळ घालवाल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला कफासंबंधित व्याधी त्रस्त करू शकते.जुनाट राेग संपुष्टात येतील. वातपीडा नाहीशी हाेईल. आळस व थकवा जाणवेल. दुखापत हाेण्याचीही श्नयता आहे. स्वत:च्या तब्बेतीची काळजी घ्यावी. अतिआत्मविश्वासू हाेऊ नये. आईच्या तब्बेतीची चिंता सतावू शकते.
 
शुभदिनांक : 23, 24, 25
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात मद्यपान करून वाहन चालवू नये. सीटबेल्ट, हेल्मेट घालून स्वत:च्या लेनमधून जावे. रेसड्रायव्हिंग टाळावे.
 
उपाय : लाल कापडात गहू, गूळ बांधून गरजूला दान दिल्यास सर्व इच्छा पूर्ण हाेतील