मिथुन

    24-May-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात अधिकारी वर्गाशी मैत्री करणे फायदेशीर ठरेल. व्यापारात बेपर्वाई करू नये. परस्परविश्वास व सामंजस्याने काम पूर्ण हाेऊ शकेल. मानसिक ताण टाळण्यासाठी याेग व ध्यान करावे. कारभार वाढेल, कमाईचे नवे स्राेत मिळतील.
करियरला नवी दिशा देण्यासाठी उत्तम काळ.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात विद्यार्थ्यांना याेग्य दिशेने केलेले श्रम व जिद्द अवश्य फळ देईल. जास्त परिश्रमाचे कमी परिणाम मिळण्याची श्नयता आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. पैशासंबंधित त्रास संपुष्टात येतील. नाेकरीत प्रगतीच्या संधी चालून येतील.
 
नातीगाेती : नात्यांमधील चढ-उतारांचा सामना तुम्हाला नेहमी करावा लागताे आणि हे तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे या कारणाने त्रस्त राहू नका कारण शेवटी साऱ्या गाेष्टी तुमच्या बाजूने हाेताना दिसत आहेत. तुम्ही तुमचे काम तुमच्या कुटुंबीयांपासून अजिबात दूर ठेवायला हवे.
 
आराेग्य : या आठवड्यात मानसिक शीण व दातांचा त्रास असण्याची श्नयता आहे. चिंता व कुशंकांचा अंत हाेईल. अंगात उत्साह राहील. वडिलांची तब्बेत जपावी. डाेळे व डाेकेदुखी त्रास देण्याची श्नयता आहे. झाेप पूर्ण घ्यावी. सकाळी नाश्त्यात गूळ फुटाणे खावेत.
 
शुभदिनांक : 23, 24, 25
 
शुभरंग : पांढरा, पिवळा, लाल
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात काैटुंबिक समस्यांनी मन विचलित हाेऊ शकते.संततीचे अपयश त्रस्त करू शकते. मन शांत ठेवावे.
 
उपाय : या आठवड्यात नित्यनेमाने घराच्या उत्तर भागात गायीसाठी गवत ठेवावे. गरीब गरजूला मूग व गूळ द्यावा.