मकर

    24-May-2022
Total Views |

Horoscope
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात प्रयत्न व परिश्रमाने समाधान मिळणार आहे. नव्या याेजनांचे सार्थक हाेईल. अपरिचितांवर जास्त विसंबून राहू नये.व्यवसायात भांडवल गुंतवण्यापूर्वी बाजारातील स्थितीचे अवलाेकन करावे.रागावर नियंत्रण ठेवावे. अतिमाेह टाळावा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदारांना बदलीला सामाेरे जावे लागण्याची श्नयता आहे. वरिष्ठांशी तुमचे मतभेद राहण्याची श्नयता आहे.व्यापारी वर्गासाठी व्यापारात बदल करण्याची श्नयता दिसून येत आहे. जे अद्याप व्यवसायात यशस्वी झाले नाहीत ते यशासाठी प्रयत्न करीत राहतील.
 
नातीगाेती : नात्यांबाबत तुम्ही या आठवड्यात थाेडे द्विधावस्थेत राहाल.मन आणि मेंदूत द्वंद्व चालेल, पण अखेरीस मनाचा विजय हाेईल. तुमच्यावर तुमच्या माणसांचा विश्वास वाढेल आणि तुम्ही खूप सुंदरतेने नात्यांना सांभाळून ठेवू शकाल. हे खूप साेपे असणार नाही पण तुम्हाला खूप धडे देईल.
 
आराेग्य : कुटुंबीयांच्या तब्बेतीत काहीशी कुरबूर राहणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंतातूर राहाल. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास संभवताे. त्याचप्रमाणे वाहन चालवणे व इतर जाेखमीची कामे करताना सावधगिरी बाळगावी. मुका मार लागू शकताे.
 
शुभदिनांक : 23, 24, 25
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : जाेखीम पत्करण्याच्या वृतीला अंकुश घालण्याची गरज आहे. काेणत्याही कायदेशीर प्रकरणात पडून चिंता करणे आराेग्यास घातक ठरू शकते.
 
उपाय : साेमवारी सकाळी स्नानानंतर शिवपूजनासाठी पूर्वेकडे वा उत्तरेकडे ताेंड करून बसावे. एखाद्या शिवालयात जाऊन पवित्र पाण्याने अभिषेक करावा.शिवपरिवाराचे पूजन चंदन, गूळ, जाणवे, कापूर इ. पूजासाहित्याने कराव