मेष

    24-May-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात एखादी इच्छित वस्तू मिळेल. शुभ व मंगलकार्य हाेईल.भागिदारासाेबतच्या गैरसमजांचे निराकरण हाेऊ शकेल. मनाेबळ वाढेल.कुटुंबात एखाद्या आयाेजनाची चर्चा हाेईल. रागावू नये व मन शांत राखावे.आर्थिक बाबीत इतरांच्या सल्ल्यामुळे नुकसान हाेण्याची श्नयता आहे.विराेधकांपासून सावध राहावे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदाराची बदली हाेण्याची श्नयता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद संभवताे. व्यापारी वर्गासाठी व्यापारात बदल हाेण्याची श्नयता असेल. जे अद्याप आपल्या व्यवसायात यशस्वी हाेऊ शकलेले नाहीत ते यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्य संबंधात माधुर्य टिकून राहील.अनावश्यक वाद घालणे टाळावे. आई-वडिलांसाेबत प्रेममय संबंध राहतील.मित्रांसाेबत फिरायला वा सिनेमाला जाऊ शकता. नवीन व्य्नतींसाेबत संबंध जाेडण्यापूर्वी पूर्ण विचार करावा. आणि नंतरच पुढे जावे.
 
आराेग्य : कुटुंबासाेबत वेळ घालवायला हवा. कारण एखाद्या वृद्घ व्यक्तीची तब्बेत बिघडू शकते. वाहन सावधानतेने चालवावे. कफासंबंधित राेग त्रस्त करण्याची श्नयता आहे. जुनाट व्याधी संपुष्टात येतील.
 
शुभदिनांक : 22, 26, 28
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात नवे काम निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा भविष्यात अनेक समस्या उभ्या राहू शकतात.
 
उपाय : या आठवड्यात कबुतरांना दाणे टाका. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट हाेऊन कुटुंबात शांतता नांदेल