संध्यानंद.काॅम
जे मिळाले आहे त्यात असमाधानी असणे ही एक मानवी प्रवृत्ती आहे.जीवनात हवे ते सर्व मिळालेले भाग्यवान फार थाेडे असतात. बहुसंख्य लाेकांना काही ना काही तडजाेड करून जगावे लागते. स्वप्ने खूप असली, तरी ती त्यातील सगळी पूर्ण हाेण्याची श्नयता नसते, ही वस्तुस्थिती मान्य केली, तर अपेक्षाभंगाचे दु:ख टळते.इच्छांची पूर्तता करावयाची असेल, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि ते केले तरी अनेकदा अपयश येते. पण ताेही जीवनाचा एक अटळ भाग असल्याने त्याचा अतिविचार करून फायदा हाेत नाही. आपल्या इच्छापूर्तीपासून आपल्याला राेखणारी बाब काय याचा कधी विचार केला आहेत का? या प्रश्नात अनेक जण गुंतून राहतात आणि त्यांच्या रात्री झाेपेविना जातात. असे लाेक दिवसाही त्यांच्या स्वप्नांमध्ये गुंगून राहतात आणि त्यातून निर्माण हाेते अस्वस्थतता. मग वाढते चिडचिड. पण ‘गाेल्डन ट्रिनिटी’ समजून घेतलीत तर आपल्या चुका काय झाल्या आणि त्यातून बाहेर कसे यावे याची माहिती मिळेल.
आपल्या अंतर्मनात निर्माण हाेणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अंतर्मनातच असतात. पण या उत्तरांवरील पडदा दूर झाल्याशिवाय ती मिळत नाहीत हेही सत्य.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तीन सुवर्ण चरण असतात आणि ते एकत्र आल्यावर स्वप्ने पूर्ण हाेतात. त्यालाच ‘गाेल्डन ट्रिनिटी’ म्हणतात. तुमचे भाग्य, तुमची रणनीती आणि त्यावर काम करण्याची तुमची क्षमता असे हे तीन चरण आहेत. यातील भाग्य काेणाच्या हाती नसले, तर अन्य बाबी आपल्या हाती असतात. त्यांचा क्रमबद्ध पद्धतीने वापर करून तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता.गाैण मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू नका एक माणूस एका दिवसात सर्वसाधारणपणे 35 हजार निर्णय घेत असल्याचे विविध संशाेधनांतून दिसले आहे. यात सकाळच्या नाष्ट्याला काय खावे यापासून रात्री किती वाजता झाेपावे यापर्यंत सर्व काही येते. पण हे सगळे निर्णय एकाच वेळी घेणे आणि त्यासाठी खूप ऊर्जा वापरली जाणे असंभव आहे. कारण, सकाळी नाष्टा काय करावा, कपडे काेणत्या रंगाचे असावेत आदी निर्णयांसाठी फार डाेके वापरण्याची गरज नसते.
जगातील यशस्वी माणसांकडे पाहिलेत, तर ते एकाच रंगाचे आणि एकाच पद्धतीचे कपडे वापरत असल्याचे दिसेल. राेज काेणत्या रंगाचे कपडे घालावेत याचा निर्णय घेण्यासाठी लागणारा वेळ अन्य एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वापरता येताे असा या लाेकांचा त्यामागील युक्तिवाद आहे.हे सांगण्याचा हेतू एवढाच, की दैनंदिन जीवनातील छाेट्या घटनांसाठी खूप ऊर्जा आणि मेंदूची ताकद वापरण्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या कामांसाठी ऊर्जा वापरण्यामुळे फायदा हाेताे.विचार आणि कृतीमध्ये हवा ताळमेळ आपण जे बाेलताे ते कृतीत आणणे हा आपल्याला हवे असलेले आयुष्य जगण्याचा सर्वांत चांगला उपाय आहे. केलेला विचार कृतीत आणणे महत्त्वाचे असते. मग ते काेणाला दिलेले वचन असाे किंवा स्वत:ला दिलेला शब्द असाे. स्वत:ला दिलेला शब्द पाळण्याबाबत आपण गंभीर हाेताे तेव्हा जीवनाविषयीसुद्धा गंभीर हाेताे. या सवयीमुळे आपले नातेसंबंध भक्कम हाेतात आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडते.
आपल्याला काय हवे आणि ते कसे मिळवायचे याची याेजना तुम्ही तयार करायला हवी. ती नसेल तर काही उपयाेग नाही. एका अज्ञात राेमन तत्त्ववेत्त्याचे एक विधान कायम लक्षात ठेवायला हवे. ताे म्हणताे, ‘आपण काेठे चाललाे आहाेत याची नावाड्याला माहिती नसेल, तर हवा काेणत्या दिशेने वाहते आहे याला महत्त्व नाही.’ आपण आपली ऊर्जा कशासाठी वापरताे आहाेत याची माहिती आपल्याला असायला हवी हे या विधानाचे तात्पर्य आहे.स्वप्नांच्या पूर्ततेसाठी निर्णयक्षमता फार महत्त्वाची असते. पण आपला निर्णय याेग्य की अयाेग्य, हे ठरविण्यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून असणे अयाेग्य ठरते. आपल्या आयुष्याबाबत आपणच निर्णय करायला हवेत हे लक्षात ठेवा. उदा. तुम्ही घर बांधू इच्छित असाल, तर त्याची काही याेजना तयार केल्याशिवाय ते बांधता येईल का?
आधी घरासाठी खर्चाची तरतूद करावी लागेल, ते कसे असावे याचा नकाशा तयार करावा लागेल, मग बांधकामाचे साहित्य आणावे लागेल, आदी टप्प्यांनी घर पूर्ण हाेईल. एक घर बांधण्यासाठी एवढा विचार करावा लागताे, तर जीवनातील निर्णय घेताना किती विचार करावा लागेल हे तुम्हाला समजेल. त्यासाठीच जीवनाबाबत याेजना असायला हवी. पुन्हा घराचेच उदाहरण बघा.
तुम्हाला घर घ्यावयाचे असेल, तर एजंट तुम्हाला ती दाखविताे, त्या घरांची वैशिष्ट्येही सांगताे. पण तुमच्याकडे काही याेजना नसेल, तर तुम्ही एजंटाच्या सांगण्यानुसार घर घेण्याचा विचार करता. म्हणजे यात हा महत्त्वाचा निर्णय तुम्ही केलेला नसताे. पण घर कसे असावे, आपले बजेट काय, याचा विचार केलेला असेल, तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घर घेऊ शकता. त्यामुळेच आपले निर्णय आपण घेणे महत्त्वाचे आहे. कारण, आपल्याशिवाय अन्य काेणी आपल्याला एवढे चांगले ओळखत नसताे.