कन्या

03 Dec 2022 14:20:01
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्हाला जीवनाचे लक्ष्य गाठण्यासाठी तुम्ही केलेल्या कामात यश मिळेल. मानसिक-शारीरिक रूपात खूश राहाल. दुर्गामातेवर श्रद्धा ठेवावी. तब्येतीबाबत सावध राहावे. नाेकरीत मिळालेल्या काेणत्याही जबाबदारीबाबत बेपर्वा राहू नये. अन्यथा एखादी समस्या उद्भवू शकते.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष मेहनतीची गरज असणार आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या कामांत समस्यांना सामारे जावे लागू शकते.उच्चशिक्षणाची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला उत्तम परिणाम मिळतील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या काैटुंबिक जीवनात त्रास पाहायला मिळू शकताे. कधी कधी कुटुंबात अडचणींचाही सामना करावा लागू शकताे. अशावेळी तुम्हाला मानसिक चिंताही सतावत राहतील. कुटुंबात एखाद्याची तब्येत खराब असल्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाल.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या उत्तम आराेग्यासाेबत जीवन जगताना दिसून येईल. तुम्हाला हात, पाेट व किडनीसंबंधित आजार सतावू शकतात. त्यामुळे मानसिक ताण राहू शकताे. यासाठी तुम्ही तब्येतीकडे जास्त लक्ष द्यावे.
 
 शुभदिनांक : 29, 30, 02
 
 शुभरंग : पांढरा, निळा, हिरवा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरवर जास्त लक्ष द्यावे. रागावर ताबा ठेवावा.
 
 उपाय : या आठवड्यात दुर्गामातेची पूजाअर्चा करावी.
Powered By Sangraha 9.0