वादाने संबंध बिघडवू नका

    03-Dec-2022
Total Views |
 
 

relation 
 
जी गाेष्ट आपल्याला तत्त्वतः पटत नाही, याेग्यच वाटत नाही, शक्य हाेणार नाही; तिथं आपल्या भूमिकेवर ठाम असायला हवं. पण, त्यातही वादविवाद टाळून मुद्दा मांडता येताे का तेही पाहायला हवं. कमी-अधिक ायद्याचा विचार करता आला, तर संबंधही कायम राहतात. जी गाेष्ट आपल्याला जमणारच नाही, तिथंही अहं आडवा न आणता ठाम नकारही देऊ शकलाे पाहिजे. कारण, अशा गाेष्टीत फक्त ायद्याचा विचार करून चालत नाही.ायदा काेणत्या स्वरूपात मिळणार आणि त्यासाठी आपण काेणती तडजाेड करणार, याचा ताळमेळ घालता आला पाहिजे.तडजाेड करताना मनावर ताण येणार असेल, नैतिकदृष्ट्या ती गाेष्ट अयाेग्य वाटत असेल आणि मुख्य म्हणजे आपले नुकसानच हाेणार असेल; तर तडजाेडीपेक्षा इतर पर्यायांचा विचार करता येईल.
 
अशा अवघडलेल्या परिस्थितीत राहून मनावरचा ताण वाढवून घेण्यापेक्षा त्या व्यवहारातून बाहेर पडणे कधीही हितावह. कारण, वादविवादापेक्षा तडजाेड महत्त्वाची असली, तरीही आपल्या स्वपेक्षा ती नक्कीच माेठी नाही. पण, अहं आणि स्व यातील फरकही समजून घेता आला पाहिजे.तडजाेडीचा सगळ्यात महत्त्वाचा ायदा म्हणजे नातेसंबंध टिकून राहतात. जेव्हा ायदा किती आणि त्याचे प्रमाण कसे, याचा विचार करून तडजाेड करण्याबाबत विचार करावा, असे सुचवितात त्या वेळी सर्वांत महत्त्वाचा भाग हा संबंध बिघडू नयेत, असाच असताे. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीही नेहमी हाच सल्ला देतात