महाराष्ट्राच्या कामगार कल्याण याेजना अनुकरणीय

    03-Dec-2022
Total Views |
 
 
 

policy 
उत्तर प्रदेशचे मंत्री राजभर यांचे गाैरवाेद्गार : डाॅ. सुरेश खाडे यांच्याशी संवाद साधला राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या सुरू असलेल्या, तसेच नवीन याेजनांवर राज्याचे कामगार मंत्री डाॅ. सुरेश खाडे आणि उत्तर प्रदेशचे श्रम व राेजगार मंत्री अनिल राजभर यांच्यात संवाद झाला. यावेळी राजभर यांनी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण याेजना अनुकरणीय आहेत, असे काैतुकाेद्गार काढत खाडे यांना उत्तर प्रदेश भेटीचे निमंत्रण दिले. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत दाेन्ही राज्यांतील कामगारांसाठीच्या विविध कल्याणकारी याेजनांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले.राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध कल्याणकारी याेजना राबवत आहे. कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन आणि राज्य कामगार विमा याेजना (ईएसआयसी) रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
 
कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री घरकुल याेजनेंतर्गत नाेंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याबराेबरच कामगारांच्या मुलामुलींसाठी क्रीडा संकुल याेजना राबवण्याचा मानस आहे. 55 वर्षांवरील घरेलू नाेंदणीकृत कामगारांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे खाडे यांनी सांगितले.कामगारांसाठी चांगले काम करणाऱ्या राज्यातील याेजना, उपक्रमांच्या माहितीचे आदान-प्रदान, संवाद हाेणे गरजेचे आहे. उत्तर प्रदेश सरकारने श्रमिक कामगारांच्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नवाेदय विद्यालयाच्या धर्तीवर अटल आवासी विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या घरकुल याेजनेच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात ही याेजना राबवण्याचा मानस असल्याचे राजभर यांनी सांगितले.या वेळी असंघटित कामगार आयुक्तालय, कामगार आयुक्तालय, कामगार कल्याण मंडळ, घरेलू कामगार, आम आदमी विमा याेजना, महाकल्याण क्रीडा प्रबाेधिनी आदी याेजना, उपक्रम आणि कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.