वृषभ

    03-Dec-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्याची स्थिती तुमच्यासाठी संमिश्र आहे. तुम्ही कुटुंबात तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल आणि काेणत्याही कामात पूर्णपणे रस घ्याल. तुम्ही तुमच्या काम याेग्यप्रकारे करण्याच्या पद्धतीमुळे यश मिळवाल.व्यापारात तुम्हाला धनलाभ हाेताना दिसून येत आहे.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. तुम्ही भागीदारीत काम करीत असाल, तर तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्राेत मिळू शकतात. नाेकरदार जातकांनी कामावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या डेली रूटीनमध्ये बदल करून तुमची काही कामे उद्यावर ढकलू शकता.
 
 नातीगाेती : या आठवड्यात स्थिती वृषभ राशीच्या जातकांसाठी थाेडी त्रासदायक असू शकते. तुम्हाला या आठवड्यात तुमच्या बाेलण्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा हाेऊ शकते. आठवड्याच्या मध्यात आई-वडिलांसाेबत प्रवासाला जाऊ शकता.
 
 आराेग्य : हा आठवडा आराेग्याच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या माेसमी आजाराने त्रस्त हाेता त्या आजारापासून या आठवड्यात तुम्हाला आराम मिळू शकताे. या आठवड्यात वजन स्थिर राखणे तुमच्यासाठी एक आव्हान असेल; पण तुम्ही शिस्तबद्ध राहून ही समस्या साेडवू शकता.
 
 शुभदिनांक : 28, 01, 03
 
 शुभरंग : पिवळा, हिरवा, निळा
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात रस्त्यावर वाहन चालवताना दक्षता बाळगण्याची गरज आहे.
 
 उपाय : या आठवड्यात दुर्गामातेच्या महामंत्राचा जप करावा.