राज्यात खनिकर्म संशाेधन संस्था सुरू करावी

    03-Dec-2022
Total Views |
 
 

Research 
 
गुंतवणूकदारांच्या परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांची सूचना महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला माेठा वाव असून, गडचिराेलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत माेठा स्टील प्लांट सुरू करू शकताे. राज्यात खनिकर्म संशाेधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह राेजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काेळसा व खनिकर्म गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय परिषदेत सांगितले.
 
वाणिज्यिक काेळशाच्या खाणींचा लिलाव व खाण क्षेत्रातील संधी या विषयावरील गुंतवणूकदारांच्या परिषदेत मुख्यमंत्री बाेलत हाेते. केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जाेशी, केंद्रीय रेल्वे आणि काेळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे, केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, केंद्रीय काेळसा मंत्रालयाचे सचिव अमृतलाल मीना आदी मान्यवर उपस्थित हाेते.
 
महाराष्ट्रात सध्या 13 काेळसा खाणींचा लिलाव करण्यात येत आहे. 2040 मध्ये वजेची मागणी दुप्पट हाेईल, त्यावेळेस अखंडित वीज पुरवठ्यासाठी काेळसा आवश्यक असून, त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. वीजनिर्मिती प्रकल्पांनी 20 दिवस पुरेल एवढा काेळसा राखीव ठेवावा. काेळसा खाणींच्या मंजुरी प्रक्रियेत सुलभता आणली जात आहे. त्याचबराेबर सिंगल विंडाे व्यवस्थाही निर्माण करण्यात आल्याचे जाेशी यांनी सांगितले. दानवे, भुसे, भारद्वाज, मीना आणि नागराजू यांनी मनाेगत व्यक्त केले.