लाेकसहभागातून मुंबई सर्वांत सुंदर शहर बनवणार

03 Dec 2022 14:45:29
 
 

Mumbai 
पालकमंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लाेढा यांच्या उपस्थितीत ‘स्वच्छ मुंबई’ अभियानास प्रारंभ मुंबईला सर्वांत स्वच्छ, सुंदर आणि निराेगी शहर बनवण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लाेकसहभागातून पूर्ण करणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी सांगितले.बृहन्मुंबई महापालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ उपक्रमाचे केसरकर यांच्या हस्ते जी-उत्तर कार्यालय परिसरात, तर लाेढा यांच्या हस्ते वांद्रे व एच ईस्ट वाॅर्ड येथे करण्यात आले.या वेळी स्थानिक आमदार सरवणकर, मुंबई पालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित हाेते. हा उपक्रम 31 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
 
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी मुंबइ पालिका दरवर्षी देत असलेल्या सुविधांचे, तसेच पालिका कामगारांशी संवाद साधून केसरकर यांनी या कामगारांच्या कामाचे काैतुक केले. उपायुक्त बिरादार यांनी स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.वांद्रे व एच ईस्ट वाॅर्डमध्ये झालेल्या कार्यक्रमात स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. एच ईस्ट वाॅर्डमध्ये आमदार पराग अळवणी, वांद्रे येथे मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, जिल्हा नियाेजन अधिकारी भूषण देशपांडे व अन्य शासकीय अधिकारी उपस्थित हाेते.
Powered By Sangraha 9.0