विजेचा वापर न करणारी मे्निसकाेमधील माया जमात

03 Dec 2022 14:36:00
 
 
विजेपासून संस्कृतीला धाेका असल्याचे मानतात; केवळ 10 हजार मूळ निवासी आहेत
 

Mexico 
 
चंद्रच काय, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने माणूस मंगळ ग्रहावरदेखील पाेहाेचला आहे.असे असले तरी दुसरीकडे काही समुदाय आपली संस्कृती, पारंपरिक रीतिरिवाज जपण्यासाठी विज्ञानाची कास धरत नसल्याचे दिसून आले आहे.प्राचीन माया संस्कृतीतील लाेक अजूनही त्यांच्या घरांत प्रकाशासाठी किंवा इतर काेणत्याही कारणासाठी वीज वापरत नाहीत. त्यांचा असा अंधविश्वास आहे, की विजेच्या वापराने यामुळे त्यांची संस्कृती आणि परंपरा धाेक्यात येऊ शकते. विजेमुळे येथे पर्यटक येतील, असे त्यांना वाटते.त्यांच्या येण्याने संस्कृती धाेक्यात येईल.यामुळेच ते स्वयंपाकासाठी गॅसचादेखील वापर करत नाहीत. त्याऐवजी पारंपरिक चुलीवर अन्न शिजवतात. या संस्कृतीतील लाेक जंगलाचे रक्षण करतात. शतकानुशतके येथील जीवनशैलीत काेणताही बदल झालेला नाही. त्याचबराेबर त्यांचे अस्तित्वही निसर्गाभाेवती फिरत असते.
 
या सभ्यतेतील लाेकांची दिनचर्याही ऋतूंच्या आधारे ठरवली जाते. माया संस्कृतीतील माेपान भाषा बाेलणारे हे लाेक बेलीझ आणि ग्वाटेमालाचे मूळ रहिवासी आहेत. त्यांची लाेकसंख्या देशात फक्त 10 हजार आहे, जी मे्निसकाे देशाच्या लाेकसंख्येच्या फक्त 3 टक्के आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची संस्कृती जपली गेली आहे.बेलीझ ही मूळ माया वसाहत हाेती. याबाबत संताक्रूझ समुदायाचे जाेस मेस म्हणतात, की इतर जगापेक्षा येथील जीवन अतिशय सुरक्षित आहे. जग झपाट्याने बदलत असल्याने त्यांना त्यांच्या जमिनी आणि घरांचे संरक्षण करण्यासाठी कठाेर संघर्ष करावा लागताे.ग्वाटेमालाच्या दक्षिणेकडील टाेलेडाे जिल्ह्यात पर्यटन वाढवण्यासाठी नवीन मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. पर्यटन वाढवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण पर्यटक त्यांच्यासाेबत आजार घेऊन येतात. वास्तविक माया गावांमध्ये सामूहिक पर्यटन हाेऊ शकते हे नक्की.
Powered By Sangraha 9.0