जिज्ञासेमुळे स्मरणशक्ती 30 ट्नके वाढते

03 Dec 2022 14:30:41
 
 

Memory 
 
जीवन जगताना आपल्यात जिज्ञासा असली पाहिजे. जिज्ञासा आपल्याला नवनवीन शिकण्यास मदत करते.त्यामुळे तणाव दूर हाेताे. आपली स्मरणशक्ती आणि सर्जनशीलता वाढते.एवढेच नाही तर तुमचे मन नाेकरीतही गुंतलेले राहते.वास्तविक जीवनात जिज्ञासा किती महत्त्वाची आहे आणि त्याचे फायदे काय असू शकतात, यावर संशाेधन झाले आहे. कॅलिफाेर्निया विद्यापीठात केलेल्या एका संशाेधनात असे दिसून आले आहे की, कुतूहलामुळे, वस्तुस्थिती लक्षात ठेवण्याची शक्यता 30 टक्के जास्त वाढते.
 
जेव्हा आपण काही नवीन आणि क्लिष्ट शिकण्याचा प्रयत्न करत असताे तेव्हा जिज्ञासा आपली स्मरणशक्ती वाढवते, जे आपल्यासाठी कार्य अधिक आकर्षक बनवते. त्याच वेळी, आपले मन यात गुंतलेले असते, या काळात आपण ज्या वस्तुस्थिती लक्षात ठेवू त्याबद्दल आपण उत्सुकतेने कार्य करू.आणखी एका संशाेधनानुसार, जिज्ञासा आपल्याला अधिक सर्जनशील बनवते आणि समस्यासाेडवण्यास मदत करते.अमेरिका आणि जर्मनीमधील उद्याेगांच्या श्रेणीतील 800 हून अधिक सहभागींचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. यात लाेकांच्या दैनंदिन जीवनातील जिज्ञासेच्या अनुभवांचे मूल्यमापन करण्यात आले.यामध्ये असे दिसून आले, की जिज्ञासू असलेल्या लाेकांना त्यांच्या कामाचा इतरांपेक्षा जास्त आनंद झाला.
Powered By Sangraha 9.0