तरुणांची साेशल मीडियावरील सक्रियता कमी हाेत आहे

    03-Dec-2022
Total Views |
 
 

Media 
 
जनरेशन झेड म्हणजेच सन 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेले लाेक. हे लाेक आता साेशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर नियमितपणे सक्रिय नाहीत. आभासी जगाच्या मैत्रीवरचा त्याचा विश्वास उडाला आहे. तर 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेले 26 ते 41 वयाेगटातील लाेक अजूनही नियमितपणे फेसबुक वापरत आहेत.प्यू रिसर्च सेंटरच्या नवीन सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील 13 ते 17 वयाेगटातील केवळ 32 टक्के लाेक नियमितपणे फेसबुक वापरत आहेत. सन 2014-15 मध्ये, 71 टक्के किशाेरवयीन फेसबुक वापरकर्ते हाेते. ते इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या इतर साेशल साइट्सचाही वापर करत हाेते. अमेरिकेत किशाेरवयीन साेशल मीडिया वापरकर्त्यांच्या संख्येत झालेली घट अचानक नव्हती.
 
गेल्या 5 वर्षांत किशाेरवयीन मुलांमध्ये नियमित फेसबुक वापरण्याचे प्रमाण दरवर्षी कमी झाले आहे.गेल्या काही वर्षांत, साेशल साइट्सवरून डेटा लीक आणि गाेपनीयतेला धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे जनरेशन झेडमध्ये साेशल मीडियाची क्रेझ कमी झाली असून, त्यांचा फेसबुकबाबत भ्रमनिरास झाला आहे.ते सहजपणे नवीन साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर स्विच करतात.फेसबुकची मूळ कंपनी मेटाच्या इन्स्टाग्रामवर 62 ट्नके किशाेरवयीन मुले आहेत, परंतु ते देखील ते नियमितपणे वापरत नाहीत. त्यांना याचा पटकन कंटाळा येताे. यामुळेच साेशल मीडिया कंपन्या वेगवेगळ्या फीचर्ससह नवनवीन साेशल साइट्स लाँच करतात.फेसबुकचा अंदाज आहे की, येत्या काही वर्षांत अमेरिकन जनरेशन झेड आता फेसबुकचा नियमित वापरकर्ता राहणार नाही, परंतु मागील पिढी फेसबुक वापरत राहील.
 
याबाबत प्राेफेसर डाॅ. डस्टिन याॅर्क म्हणतात की, फेसबुक आणि इतर साेशल साइट्स जनरेशन झेडला आकर्षित करण्यासाठी बरेच बदल करत आहेत. पण इंग्लंडमधील प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या आणखी एका सर्वेक्षणात तरुणांमध्ये व्हिडिओची क्रेझ वाढत असल्याचे समाेर आले आहे.भारतातील 73% किशाेरवयीन मुले दीर्घकाळ साेशल मीडिया वापरतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल टेस्टिंग अँड न्यूराेसायन्सेसच्या अहवालानुसार, भारतातील 73 टक्के मुले माेबाइल वापरतात. यापैकी 30 टक्के मुले ही मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. 10पैकी 3 मुले नैराश्य, भीती, चिंता आणि चिडचिडेपणाने त्रस्त आहेत. अमेरिकेतील नेचरकम्युनिकेशन्समधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, साेशल मीडियाच्या वापरामुळे किशाेरवयीन मुलांच्या मेंदू, हार्माेन्स आणि वर्तनावर परिणाम हाेताे.