मिथुन

    03-Dec-2022
Total Views |
 
 
 

Horoscope 
मिथुन राशीच्या व्य्नतींना हा आठवडा काही नवे घेऊन येणार आहे. तुम्ही घरात चालू असलेल्या वादाच्या काेणत्याही प्रकरणाला धैर्याने ताेंड देण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही मुलांच्या एखाद्या गाेष्टीकडे दुर्लक्ष केल्यास ताे तुमच्यावर नाराज हाेऊ शकताे. तुम्ही तुमच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे.
 
 नाेकरी-व्यवसाय : व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुम्ही भागीदारीत काम करीत असल्यास तुम्हाला फायदेशीर स्राेत मिळण्याची श्नयता आहे. नाेकरी करीत असणाऱ्यांचा कार्यक्षेत्रात सत्कार हाेईल.तसेच वर्षाच्या उत्तरार्धात थाेडे प्रतिकूल परिणाम मिळू शकतात.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांबाबत अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. तुमचे वडिलांसाेबत चालू असलेले वाद या आठवड्यात दूर हाेतील.तसेच विवाहित जातकांना या आठवड्यात संततिसाैख्य लाभेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील पण विराेधकांपासून सावध राहावे.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्याच्या बाबतीत काही समस्या येण्याची श्नयता आहे. अशावेळी तुम्ही आधीपासूनच तुमच्या तब्येतीबाबत सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला एखादी छाेटी-माेठी समस्या त्रास देऊ शकते, नियमित याेग व व्यायामाने त्यावर मात करू शकता. आहाराकडे लक्ष द्यावे.
 
 शुभदिनांक : 27, 02, 03
 
 शुभरंग : भुरा, पिवळा, काळा
 
 शुभवार : साेमवार, बुधवार, शनिवार
 
 दक्षता : खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे. कामात घाई करू नये. अन्यथा अपयश येऊ शकते.
 
 उपाय : या आठवड्यात राेज सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा. रविवारी सूर्यदेवाची विशेष पूजा करावी