चिंतांवर मात करण्यासाठी ध्यान उपयुक्त

    03-Dec-2022
Total Views |
 
 
 
संध्यानंद.काॅम
 

Care 
 
स्पर्धा आणि तणावांच्या सध्याच्या काळात चिंताग्रस्तांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सजगतेने केलेल्या ध्यानामुळे (माइंडफूलनेस मेडिटेशन) त्यावर मात करता येणे श्नय आहे. या प्रकारच्या ध्यानामुळे चिंतांमधून उद्भविणारे विकार कमी हाेत असल्याचे ‘जामा सायकीअ‍ॅट्री’मधील लेखात म्हटले असून, त्यासाठी सर्वसाधारण 33 वर्षे वय असलेल्या 276 रुग्णांवर केलेल्या प्रयाेगाचा दाखला देण्यात आला आहे. ‘माइंडफूलनेस-बेस्ड स्ट्रेस रिड्नशन’ (एमबीएसआर) असे नाव या प्रयाेगाला देण्यात आले हाेते.चिंता आणि औदासीन्यावर मात करण्यासाठी या पद्धतीचा काय उपयाेग हाेताे, याची माहिती या प्रयाेगातून घेण्यात आली. या प्रयाेगात आठवडाभर राेज अडीच तासांचे वर्ग आठ आठवडे घेतले गेले. पाचव्या आणि सहाव्या आठवड्यात संपूर्ण दिवस वर्ग घेतले गेले आणि सहभागींना घरी राेज 45 मिनिटे सराव करण्याच्या सूचना दिल्या गेल्या हाेत्या.
 
प्रयाेगाला प्रारंभ करण्यापूर्वी सहभागींमधील चिंतेची पातळी तपासली गेली आणि नंतर आठव्या, बाराव्या आणि 24व्या आठवड्यात ती पुन्हा तपासली गेली. 1 ते 7 या मापदंडावर चिंतेची पातळी ठरविली गेली. यातील 7 हा आकडा आत्यंतिक चिंतेचा हाेता. प्रयाेगाच्या प्रारंभापूर्वी सहभागींमधील चिंतेची पातळी सर्वसाधारणपणे 4.5 हाेती. ध्यानाच्या प्रयाेगानंतर सहभागींमधील चिंतेचे प्रमाण 1.35 पाॅइंट्सने कमी झाल्याचे आढळले. या विकारावर औषधे घेत असलेल्या गटातील सहभागींची चिंता 1.43 पाॅइंट्सने कमी झाली हाेती. सजगतेने केलेल्या ध्यानामुळे जीवन आराेग्यदायी हाेत असल्याचे अमेरिकन हार्ट असाेसिएशनने केलेल्या पाहणीतही दिसले आहे. उच्च र्नतदाबाचा त्रासही त्यामुळे कमी हाेत असल्याचे आढळल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे.
 
काेलेस्ट्राॅल कमी करण्यात सप्लिमेंट्स निरुपयाेगी हृदयाच्या आराेग्यासाठी उपयु्नत असल्याचे मानली जाणारी सहा डाएटरी सप्लिमेंट्स काेलेस्ट्राॅल कमी करू शकत नसल्याचे ‘जर्नल ऑफ अमेरिकन काॅलेज ऑफ काॅर्डिऑलाॅजी’मधील लेखात म्हटले आहे. लाे-डाेस स्टेटिननच्या तुलनेत हे प्रमाण आहे. या डाएटरी सप्लिमेंट्सचा खराेखर उपयाेग हाेताे की नाही, हे तपासण्यासाठी संशाेधकांनी ही माहिती घेतली. वाढते काेलेस्ट्राॅल ही जागतिक समस्या झाल्यामुळे ही माहिती घेतली गेली. 40-75 वर्षेवयाेगटांतील आणि हृदय आणि र्नतवाहिन्यांच्या विकारांचा (कार्डिओव्हस््नयुलर डिसिजेस) इतिहास नसलेल्या 198 प्राैढांची माहिती यासाठी घेतली गेली. त्यांना आहारात माशांचे तेल, दालचिनी, लसूण, हळद, वनस्पतीजन्य पदार्थ (उदा.लाल यिस्ट) महिनाभर दिले गेले. त्यांना राेज 5 एमजी या प्रमाणात स्टेटिनचा लाे डाेसही दिला गेला. लाे-डेन्सिटी लिपाेप्राेटिनवर (एलडीएल) त्याचा काय परिणाम हाेताे हे तपासले गेले.
 
स्टेटिन घेत असलेल्या गटातील ‘एलडीएल’ची पातळी 37.9 ट्न्नयांनी घटल्याचे दिसले. एकूण काेलेस्ट्राॅलची पातळ 24 ट्न्नयांनी कमी झाली हाेती. लसणाच्या सेवनामुळे ‘एलडीएल’ची पातळी वाढत असल्याचे यात दिसले.त्यामुळे आराेग्यासाठी उपयु्नत असलेली डाएटरी सप्लिमेंट्स काेलेस्ट्राॅलची पातळी कमी करू शकत नसल्याचा दावा या लेखात करण्यात आला आहे.रिकाम्या पाेटी व्यायाम फायद्याचा आराेग्यासाठी व्यायाम उपयु्नत असला, तरी रिकाम्या पाेटी व्यायाम करणाऱ्यांचा सत्तर ट्नकेमेद (फॅट) अधिक जळत असल्याची माहिती ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्पाेर्ट न्युट्रिशन अँड ए्नझरसाइझ मेटाबाॅलिझम’मधील एका लेखात देण्यात आली आहे. खाण्यानंतर दाेन तासांनी व्यायाम करणाऱ्यांच्या तुलनेतील हे प्रमाण आहे. अनेक लाेक सायंकाळी व्यायाम करत असले, तरी रात्रभराच्या उपवासानंतर सकाळी केलेला व्यायाम जास्त फायदेशीर ठरत असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
 
जेवणानंतर केलेल्या व्यायामापेक्षा रिकाम्या पाेटी केलेला व्यायाम जास्त लाभदायी ठरताे. सायंकाळच्या उपवासानंतर केलेला व्यायाम फायद्याचा ठरताे की नाही, याची माहिती घेण्यासाठी एक प्रयाेग करण्यात आला. त्यासाठी 16 निराेगी स्त्री-पुरुषांना सायंकाळी साडेसहा वाजता मध्यम गतीने अर्धा तास सायकलिंगचा व्यायाम करण्यास सांगितले गेले. किमान 15 मिनिटे सायकल चालविणे बंधनकारक हाेते. सात तासांच्या उपवासानंतर आणि जेवणानंतर दाेन तासांनी असा दाेनदा हा प्रयाेग केला गेला. व्यायामानंतर सहभागींनी रात्रीच्या जेवणात काेणते पदार्थ घेतले, याची माहितीही घेण्यात आली. रिकाम्या पाेटी व्यायाम केलेल्यांचा मेद जास्त जळल्याचे दिसले.
 
मात्र, उपवासामुळे व्यायाम करण्याची क्षमताही कमी हाेते. भुकेमुळे अनेदा व्यायामाचा उत्साहसुद्धा घटताे. त्यामुळे रिकाम्या पाेटी व्यायामाची सवय अनेकांना जड जायला लागते; पण उपवास आणि व्यायाम यांची याेग्य सांगड घातली, तर व्यायामाचा आनंद आणि फायदा असे दाेन्ही मिळेल, असे संशाेधकांचे म्हणणे आहे.हेअर स्ट्रेथनिंग उत्पादनांमुळे कर्कराेगाचा धाेका रसायनांचा समावेश असलेल्या हेअर स्ट्रेथनिंग उत्पादनांचा वारंवार वापर करणाऱ्या महिलांना अशी उत्पादने न वापरणाऱ्या महिलांच्या तुलनेत गर्भाशयाच्या कर्कराेगाचा धाेका जास्त असताे. याबाबतच्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ द नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’मधील लेखात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. वय 35-77 वर्षांदरम्यानच्या 33,947 महिलांचा 11 वर्षे अभ्यास केल्यावर त्यातील 378 महिलांना गर्भाशयाचा कर्कराेग झाल्याची माहिती मिळाली.
 
हेअर स्ट्रेथनिंग उत्पादनांचा वर्षातून चारपेक्षा जास्त वेळ वापर करणाऱ्या महिलांना गर्भाशयाच्या कर्कराेगाचा धाेका अडीच पट असताे. वारंवार अशी उत्पादने वापरणाऱ्यांमध्ये हे प्रमाण 4.05 पट हाेत असल्याचे या लेखात म्हटले आहे. हेअर डाय, ब्लिच, हायलाइट्स किंवा पर्म्स यांच्यामुळे हा धाेका वाढताे. यापूर्वी झालेल्या अभ्यासांनुसार, हेअर स्ट्रेथनिंग उत्पादनांच्या वापरामुळे महिलांना स्तन आणि अंडाशयाच्या कर्कराेगांचा धाेका असल्याचे आढळले आहे. महिलांमधील गर्भाशयाच्या कर्कराेगाचे प्रमाण माेठे आहे.आराेग्यासाठी झाेप किती महत्त्वाची असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. किमान सात तास झाेप हवी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र, अनेकांना ती मिळत नाही. तुम्ही वयाची पन्नाशी ओलांडलेली असेल, तर सावध व्हा. कारण या वयात रात्री पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झाेपणाऱ्यांना विविध विकार सुरू हाेण्याची जाेखीम असल्याचा इशारा ‘प्लाेस मेडिसीन’मधील लेखाद्वारे देण्यात आला आहे.