मकर

03 Dec 2022 14:14:40
 
 

Horoscope 
हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहणार आहे. ते त्यांच्या शिक्षणावर पूर्ण जाेर देतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाल तर माणसे जाेडण्यात यशस्वी राहाल. तुमची धर्माबाबतची श्रद्धा वाढेल. भाग्य सुधारल्यामुळे अडलेली कामे सहजतेने हाेऊ शकतात. व्यावसायिकांना फायदा हाेईल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला करिअरबाबत सुखद परिणाम मिळवण्याची संधी मिळेल.तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी कराल. त्यामुळे तुम्ही एक उत्तम करिअर निर्माण करू शकता. व्यवसाय चालू ठेवण्यात तुम्हाला तुमच्या सहकर्मचाऱ्यांकडून मदत मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात भावा-बहिणींसाेबत उत्तम नाते स्थापित हाेईल.आई-वडिलांचे प्रेम लाभेल. तसेच नवविवाहितांना एखादा शुभसमाचार मिळू शकताे. कुटुंबामध्येही आनंदाचे वातावरण राहील. पण त्याचवेळी तुम्ही विराेधकांपासून सावध राहावे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य संमिश्र राहील. सर्दी-पडशाचा थाेडा त्रास राहू शकताे. तुम्हाला हात, पाेट वकिडनीसंबंधित आजार त्रास देण्याची श्नयता आहे.तुम्ही नियमितपणे याेग व व्यायाम करीत राहावे व वैद्यकीय सल्ला घेत राहावा. ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल.
 
 शुभदिनांक : 28, 02, 03
 
 शुभरंग : पिवळा, निळा, गुलाबी
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात खाणेपिणे सांभाळावे. काेणाशीही वाद घालू नये..
 
 उपाय : या आठवड्यात हनुमान चालिसा वाचावी.
 
Powered By Sangraha 9.0