मेष

03 Dec 2022 14:26:24
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. बिझनेस करीत असणाऱ्यांनी कटुता गाेडव्यात बदलण्याची कला शिकावी. तरच ते लाेकांकडून आपली कामे साधून घेऊ शकतील. तुम्ही लाेकांसाेबत बाेलताना पूर्णपणे सावधगिरी बाळगायला हवी; अन्यथा एखादा तुम्हाला फसवू शकताे.
 
 नाेकरी-व्यवसाय : मेष राशीच्या व्य्नतींना या वर्षाची सुरुवात प्रमाेशनसाेबत पगारात वाढ मिळवून देणारी आहे. तुम्ही तुमच्या श्रमाच्या बळावर कार्यक्षेत्रात एक वेगळीच प्रतिमा बनवण्यात यशस्वी व्हाल. व्यापारात धनलाभ हाेईल, तर नाेकरदारांसाठीही आठवडा अत्यंत अनुकूल असणार आहे.
 
 नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक नात्यात बळकटी येईल. अनेक वर्षांपासून चालू असलेले गैरसमज या आठवड्यात दूर हाेतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. त्यामुळे नात्यांमध्ये पुन्हा सुधारणा हाेईल. नवे घर वा वाहन खरेदी केल्यामुळे तुमच्या आनंदात भर पडेल व कुटुंबात सुख नांदेल.
 
 आराेग्य : हा आठवडा तब्येतीच्या दृष्टीने काहीसा समिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या मध्यात एखादा माेसमी आजार तुम्हाला सतावू शकताे. त्यामुळे तुम्ही थाेडे चिंताग्रस्त राहणार आहात. तुमच्या राेजच्या दिनचर्येत सुधारणा करायला हवी.
 
 शुभदिनांक : 27, 28, 01
 
 शुभरंग : पिवळा, जांभळा, काळा
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात विद्यार्थ्यांनी ध्येयाकडे जास्त लक्ष द्यावे. ध्येयापासून भरकटू नये.
 
 उपाय : या आठवड्यात सरस्वतीमातेची आराधना करावी, जेणेकरून तुम्हाला ज्ञानप्राप्ती हाेऊ शकेल
Powered By Sangraha 9.0