झाेप कमी झाल्यास इतरांना मदत करण्याची भावना अतिशय कमी हाेते

02 Dec 2022 15:59:35
 

sleep 
 
प्रत्येक माणसासाठी झाेप खूप महत्त्वाची असते. आपल्या शारीरिक आराेग्याबराेबरच मानसिक आराेग्यासाठीही पुरेशी झाेप आवश्यक आणि फायदेशीर आहे. त्याची कमतरता आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते. झाेपेच्या कमतरतेमुळे लाेक अनेकदा चिडचिड करतात, परंतु अलीकडील संशाेधनात असे दिसून आले आहे, की झाेपेच्या कमतरतेमुळे लाेकांना मदत करण्याची भावना 78 ट्न्नयांनी कमी हाेते.कॅलिफाेर्निया विद्यापीठातील वेगवेगळ्या संशाेधनात झाेप आणि स्वार्थी असण्याची प्रवृत्ती यांचे एकत्रित परिणाम तपासण्यात आले. सामान्य झाेपेपेक्षा एक तास कमी झाेपेमुळे किंवा झाेपेच्या व्यत्ययामुळे लाेक त्यांच्या मित्रांना आणि नातेवाइकांना मदत करू शकत नाहीत. ते स्वार्थी हाेऊ लागतात.
 
संशाेधकांना असे आढळून आले, की झाेप कमी प्रमाणात झाल्याने लाेकांच्या वर्तनावर परिणाम हाेऊ शकताे. पुरेशा झाेपेशी संबंधित या संशाेधनात, 160 सहभागींना विविध सामाजिक परिस्थितींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सहभागींनी सांगितले, की झाेपेच्या कमतरतेमुळे ते इतरांना मदत करू इच्छित नाहीत. काेणी मदत मागितली असता त्याकडे दुर्लक्ष करतात. अशी उत्तरे बहुतेकांनी दिली.दुसऱ्या एका अभ्यासात 24 लाेकांच्या मेंदूची क्रिया पाहण्यात आली. पहिल्या सत्रात सहभागी लाेक 8 तास झाेपले आणि दुसऱ्या सत्रात त्यांना अजिबात झाेप लागू दिली नाही. या वेळी केलेल्या मेंदूच्या स्कॅनिंगमध्ये असे दिसून आले की, झाेपेच्या कमतरतेमुळे मेंदूच्या इतरांसाठी विचार करणाऱ्या भागाची क्रियाशीलता कमी हाेते.म्हणजेच सामाजिक वर्तन चालविणारा मेंदूचा भाग कमी क्रियाशील असताे.
Powered By Sangraha 9.0