समुद्राच्या तळाचे दर्शन घडविणारी अल्ट्रा ल्नझरी सबमरीन तयार

    02-Dec-2022
Total Views |
 
 

sea 
 
संध्यानंद. काॅम समुद्राच्या तळाचा थांगपत्ता घेण्यासाठी 2021 मध्ये एका कंपनीने अल्ट्रा ल्नझरी सबमरीन (पाणबुडी) तयार केली व 2021 मध्ये या ल्नझरी पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले आहे.या सबमरीनमध्ये एक खलाशी व दाेन प्रवासी बसू शकतात.ही सुपर सबमरीन ताशी 10 नाॅट (11 मैल) वेगाने समुद्रात चालते. ही सबमरीन समुद्रात 984 फूट (300 मीटर) खाेल बुडी मारू शकते. या सनमरीनचा वेग डाॅल्फिन माशापेक्षा 3-4 नाॅटने जास्त आहे.
 
बुलेट आकाराची ही ई-सबमरीन ईकाे टुरिस्टसाठी उपयु्नत आहे. या सबमरीनमध्ये बसून समुद्रतळातील कासव, शार्क इ. असंख्य समुद्री जलचरांचे मरीन लाइफ जवळून अवलाेकन करता येते.ही सर्वांत जास्त डायनामिक सबमरीन आहे. या सबमरीनला 60 किलाेवाॅटचे इले्निट्रक पाॅवर इंजिन आहे, तर बॅटरी 62 किलाेवाॅटची आहे. ही सबमरीन 17.5 फूट लांब आणि 7.2 फूट रुंद असून या सबमरीनचे वजन 9071 किलाे आहे व किंमत 58 लाख डाॅलर आहे. ही सबमरीन येत्या वर्षांत सामान्य लाेकांनाही उपलब्ध हाेणार आहे.