वसईत दाेन वर्षांनंतर नाताळचा जल्लाेष

02 Dec 2022 18:25:58
 
 

Vasai 
 
काेराेनाच्या निर्बंधांमुळे गेल्या दाेन वर्षांपासून असलेल्या बंधनांतून मुक्ती मिळाल्याने यंदा नाताळ माेठ्या जल्लाेषात साजरा हाेणार आहे. नाताळाच्या ख्रिस्त आगमनाच्या काळाला सुरुवात झाली असून, वसईतील सर्व चर्चेसमध्ये रविवारी पहिली जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्ज्वलित करण्यात आली.नाताळच्या महिनाभर आधी आगमन काळ सुरू हाेताे. त्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तर तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्ज्वलित करून ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश दिला जाताे. त्यानंतर 24 डिसेंबरच्या मध्यरात्री येशूजन्माच्या वेळी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती प्रज्ज्वलित करून ख्रिस्त जन्माेत्सव साजरा केला जाताे. या आगमन काळाला सुरुवात झाली आहे.
 
रविवारी वसईच्या विविध चर्चेसमध्ये जांभळी मेणबत्ती पेटवण्यात आली. काेराेनामुळे दाेन वर्षांपासून नाताळ मुक्तपणे साजरा करता आला नव्हता. यंदा कसलेही बंधन नसल्याने चर्चमध्ये सामूहिक मिस्सा (प्रार्थना) हाेणार असून, खऱ्या अर्थाने नाताळ आनंददायी वातावरणात साजरा हाेणार आहे. कॅरल सिंगिंग, कार्निवल आणि इतर धार्मिक कार्ये यंदा वसईत साजरी केली जाणार आहेत, अशी माहिती माॅन्सेनियअर फादर फ्रान्सिस काेरिया यांनी दिली. कॅथाॅलिक चर्चचे उपासना वर्ष आगमन काळाच्या पहिल्या रविवारी सुरू हाेते. 25 डिसेंबरपूर्वी येणारे चार रविवार हे आगमन काळातील पहिला, दुसरा, तिसरा व चाैथा रविवार अशा नावांनी ओळखले जातात.
 
 
Powered By Sangraha 9.0