मूळव्याध असणाऱ्यांची चेष्टा जास्त प्रमाणात हाेते

    02-Dec-2022
Total Views |
 

Piles 
 
सर्वेक्षणातील निष्कर्ष; मुंबईसह चार महानगरांत सर्वाधिक रुग्णसंख्या मूळव्याधीबद्दल जागरूकता वाढविण्याच्या प्रयत्नात, प्रिस्टीन केअरने साेशल मीडिया माेहीम सुरू केली आहे.पाइल्सबद्दल (मूळव्याध) उघडपणे का बाेलले जात नाही हे जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्यात आला.हे संशाेधन मेट्राे शहरांमध्ये 1हजारहून अधिक लाेकांमध्ये करण्यात आले.सर्वेक्षणातून समाेर आले, की 72 टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे, की जर एखाद्याला मूळव्याधीचा त्रास हाेत असेल, तर ताे चेष्टेचा विषय हाेताे. 70% पेक्षा जास्त भारतीयांना असे आढळून आले, की मूव्हीज, टीव्ही, साेशल मीडिया किंवा दैनंदिन जीवनातील घटनांमध्ये पाइल्सचा अपमानास्पद पद्धतीने उल्लेख केला जाताे.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 40 टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे, की मूळव्याधीवर उपचार करणे शक्य नाही आणि ती आयुष्यभराची समस्या आहे.
 
या अभ्यासात असेही समाेर आले आहे, की 20 टक्के लाेकांचा असा विश्वास आहे, की मूळव्याध हा लैंगिक संसर्गामुळे हाेऊ शकते, तसेच बहुतेक लाेकांना या आजाराची कारणे माहीत असल्याचे आढळून आले आहे, तर 38 टक्के लाेक बद्धकाेष्ठतेमुळे मूळव्याध हाेते आणि 34 टक्के लाेकांना मते हा जीवनशैलीचा आजार आहे, असे वाटते. कंपनीने गेल्या वर्षी 42हून अधिक शहरांमध्ये केलेल्या प्राेक्टाेलाॅजी सल्लामसलतींसह, प्रिस्टीन केअर- लिबर डेटा लॅबमध्ये आढळून आले, की मूळव्याधीचे 80 टक्के रुग्ण पुरुष आहेत. 26 ते 40 वयाेगटातील बहुतांश भारतीय तरुणांनी मूळव्याधीवर शस्त्रक्रिया केली आहे.प्रिस्टीन केअरने केलेल्या मूळव्याध शस्त्रक्रियांपैकी 61 टक्के शस्त्रक्रिया विशिष्ट वयाेगटातील लाेकांसाठी हाेत्या. शहरांचा विचार करता, भारतात मुंबई, बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि हैदराबादमध्ये मूळव्याधीचे रुग्ण नाेंदवले आहेत.