महाराष्ट्र व ओंटारियाेत सामंजस्य करार

    02-Dec-2022
Total Views |
 
 

MOU 
 
महाराष्ट्र आणि कॅनडातील ओंटारियाे या दाेन राज्यांत विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. उद्याेगमंत्री उदय सामंत व ओंटारियाेचे (कॅनडा) आर्थिक विकास, राेजगार निर्मिती आणि व्यापारमंत्री व्हिक्टर फेडेली यांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार राज्यात माहिती तंत्रज्ञान, वित्त, मीडिया, ऑटाेमाेबाइल, अन्न प्रक्रिया, अंतराळ (एराेस्पेस) या क्षेत्रात माेठी गुंतवणूक हाेणार आहे.
 
या वेळी उद्याेग विभागाचे प्रधान सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे, कॅनडाच्या आर्थिक विकास मंत्रालय, राेजगार निर्मिती आणि व्यापार विभागाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व संचालक क्रिस्टीना क्रिटेली, व्यापार मंत्री कार्यालयाचे कर्मचारी प्रमुख हेदर पाॅटर, भारतातील वाणिज्यदूत दिग्विजय मेहरा आणि ओंटारियाे सरकारचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.