आवडत्या व्य्नतींचे दूर जाणे आवडत्या व्य्नतींचे दूर जाणे पचवावे लागते

    02-Dec-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

Happy 
 
जीवन म्हणजे अखंड सुरू असलेला प्रवास असताे. या जगात आल्यावर आपले अनेकांबराेबर वेगवेगळ्या प्रकारचे संबंध तयार हाेतात. तान्ह्या बाळासाठी आईच सर्वस्व असते. पण, ते माेठे हाेऊ लागल्यावर बाबा, काका, मामा, आत्या वगैरे नाती जाेडली जातात. मग शाळेत मित्र-मैत्रिणी येतात आणि प्राैढपणी सहकारी मिळतात. या प्रवासात आपले सगळ्यांबराेबरच जुळत नाही.काहींबराेबर कामापुरते, काहींबराेबर घनिष्ठ, तर काहींबराेबर मुळीच नाही असे घडते. आपण राेज अनेकांना भेटत असताे. त्यातील काही जण कालांतराने दूर जातात, तर काही जास्त जवळ येतात.हा जीवनाचा एक भाग असताे.

पण, यातील काही माणसे प्रश्नचिन्ह निर्माण करतात. असे लाेक भेटणे ही सर्वसामान्य बाब नसते. हे लाेक आपल्या आयुष्यात का आले आणि गेले याचा विचार आपण करताे. अशा लाेकांमध्ये आपला मित्र, एखादी ज्येष्ठ व्यक्ती, लहान मूल किंवाएखादाकर्मचारी, सहकारी असे काेणीही असू शकते.एखाद्या व्यक्तीबराेबर आपले संबंध एकदम घनिष्ठ कसे हाेतात हे ठामपणाने सांगता येत नाही. त्या व्यक्तीबराेबर पहिल्याच भेटीत आपली तार कशी जुळते आणि आपले संबंध दृढ कसे हाेतात या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेले नाही. काही तज्ज्ञांच्या मते हा याेगायाेगाचा भाग असताे. आपल्याला एखादा महत्त्वाचा धडा देण्यासाठी त्यांची याेजना झालेली असते.

अकारण काही घडत नाही : काेणाच्या आयुष्यात काेणी अकारण येत नाही. परमेश्वर जेव्हा आपले लक्ष एखाद्या खास व्यक्तीकडे वळविताे आणि इतरांपेक्षा तुम्ही त्या व्यक्तीबराेबर जास्त जाेडले जाता त्यामागे एक कारण असते. आपण मागे वळून पाहिले, तर आपल्याला काही ना काही धडा न देणारी एकही व्यक्ती दिसणार नाही. या व्यक्ती आपल्या काही तरी शिकवून जातात आणि त्याचा उपयाेग जीवनात पुढे जाण्यासाठी हाेताे. पण, या व्यक्ती त्या कामापुरत्याच येतात आणि जातात. काम झाल्यावर काेण थांबेल? आपल्याला काेणाची गरज आहे हे काही वेळा त्या वेळच्या स्थितीवरून ठरते आणि अचानक असे लाेक आयुष्यात येऊन आपल्याला मदत करून जातात. तुम्हाला एखादा प्रश्न पडला असताना त्याचे उत्तर देणारे तुम्हाला भेटतात. त्यांच्या सहवासामुळे तुमच्या समस्या साेडविण्याचा मार्ग सापडताे.

नाते जपण्याचा प्रयत्न : आपल्याला मदत केलेली ही माणसे कायमस्वरूपी मात्र जीवनात राहत नाहीत. आपण त्यांच्याबराेबरचे संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करत असलाे, तरी ते तसे ठेवण्याची या लाेकांची भूमिकाच नसते. ते आपल्या आयुष्यात सदैव साेबत राहत नाहीत. त्यांना ठरावीक काळापुरतेच आपल्या जीवनात पाठविले गेलेले असते.

निराेपाच्या वेदना : आपल्याला मदत केलेल्यांची जाण्याची वेळ झालेली असते आणि त्यांनी जाऊ नये अशी आपली इच्छा असते तेव्हा वेदना हाेतात. ही माणसे आयुष्यातून निघून गेल्याचे दु:ख आपल्याला सहन हाेत नाही आणि त्यातून नैराश्य येते. कसाेटीच्या प्रसंगात आपल्याला मदत केलेली, जीवनाला अर्थ दिलेली व्यक्ती आपल्यापासून दूर का चालली आहे हे कळत नाही. त्या व्यक्तीच्या अस्तित्वामुळेही जीवन सुंदर झालेले असताना निराेपाची वेळ येणे निश्चितच वेदनादायी असते. पण, क्षणभर थांबून असे का घडते याचा विचार करा. ती व्यक्ती जास्त काळ तुमच्या आयुष्यात राहिली तर कदाचित तिच साैंदर्य, विचार, व्यक्तिमत्त्व कमी हाेऊ लागेल. त्या व्यक्तीचे कदाचित तिचे असणे ओझेसुद्धा ठरेल. ते पेलण्याची ताकद आपल्याकडे नसते. त्यामुळे कारण संपल्यावर अशा व्यक्ती आयुष्यातून जाणार हे सत्य स्वीकारणे केव्हाही चांगले.