नाेकरीच्या पहिल्या आठवड्यात काेणती दक्षता घेतली पाहिजे?

    02-Dec-2022
Total Views |
 

Employment 
 
1) नावे लक्षात ठेवा : याबाबत शिस्त पाळलीच पाहिजे. कारण नव्या नाेकरीच्या ठिकाणी पहिले काही आठवडे हा खूप माेठा कालावधी असताे.अधिकारी, वरिष्ठ, सहकारी व इतर कर्मचाऱ्यांची नावे तुमच्या ाेनमध्ये लिहून ठेवा किंवा तुमची स्मरण यंत्रणा कार्यान्वित करा. स्मरण यंत्रणेच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका. जर का तुम्ही उंच व्यक्तिमत्वाच्या उनकुलेंना भेटला तर झाडासारखे उंच उनकुले असा पाच वेळा जप करा. म्हणजे पुढच्या वेली उनकुलेसाहेब तुमच्यासमाेर आले तर तुम्हांला लगेच त्यांचे नाव आठवेल.
 
2) प्रश्न विचारा: पण याेग्य प्रश्न विचारा.तुमचे कुतूहल जागृत ठेवा आणि प्रश्न विचारा. पण प्रश्न हे विचारी असले पाहिजेत.नाेकरीला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही गृहपाठ केलेला असला पाहिजे. कंपनी विषयी सर्वकाही वाचलेले असले पाहिजे. कंपनीचा इतिहास, उत्पादने इत्यादी.कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्हांला आणखी काही माहिती हवी असल्यास एचआर विभागाकडे विचारा.
 
3) कंपनीची संस्थात्मक रचना जाणून घ्या ही माहिती अतिशय आवश्यक असते. सध्या कंपनीतील रचना अगदी एका पातळीवर असते. पण याचा अर्थ असा नव्हे की, तिथे स्तर नाहीत. ती सुप्त स्थितीत असते आणि प्रत्येकाची भूमिका आणि जबाबदारी जाणून घ्यायला वेळ लागताे. लवकरच तुम्हांला संस्थेतील अंतर्गत रचना स्पष्टपणे दिसू लागेल. तसे झाले तर चुकून किंवा अपघाताने तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता कमी हाेते.
 
4) लवकर तुमच्यातील चमक दाखवा त्यासाठी संधी शाेधा आणि लवकर तुमच्यातील स्पार्क दिसू द्या. अगदी छाेटेसे काम असले तरी त्यात तुम्ही किती मन लावून, जास्त वेळ देऊन ते काम ठरलेल्या वेळेआधी पूर्ण करता हे महत्त्वाचे असते. त्यातन तुमच्याबद्दलचा चांगला परिणाम साधला जाताे.