कॅल्शियम जर याेग्य प्रमाणात असेल, तर रक्तदाब नियंत्रणात राहताे

    02-Dec-2022
Total Views |
 
 

Calcium 
 
हाडं तयार हाेण्यासाठी कॅल्शियम लागते तसेच हाडे चांगली राहण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असतेच; परंतु कॅल्शियम जर याेग्य प्रमाणात असेल तर रक्तदाबही नियंत्रणात राहताे.
 वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत हाडांची वाढ हाेत असते.
 चाळीशीच्या सुरुवातीला हाडांची झीज व्हायला सुरुवात हाेते.
 कॅल्शियममुळे दातही चांगले हाेतातच.
 शरीराच्या वजनाचा 1.5 टक्के भाग कॅल्शियमने व्यापलेला असताे.
 हाडे आणि दातांमध्ये 99 टक्के कॅल्शियम असते.
 बाकी 1 टक्का कॅल्शियम इतर शरीरात असते.
 आपल्या शरीरासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचे असते.
 दूध, चीझ, दही, पनीर, साेया मिल्क यातून भरपूर कॅल्शियम मिळत असतं.
 तीळ, राजमा, नाचणी, साेयाबीन, उदीड डाळ, मूगडाळ, चवळी, मसूर, यात कॅल्शियम असतं.
 अंजीर, खजूर, बदाम, जरदाळू यात कॅल्शियम असतं.
 भेंडी, पालक, खाेबरे, कांदा, काेबी, लाल भाेपळ्याच्या बिया, शेवग्याच्या शेंगा यातून कॅल्शियम मिळू शकतं.
 संत्री, किवी, मलबेरी या फळांमध्येही कॅल्शियम असतं.