हाडं तयार हाेण्यासाठी कॅल्शियम लागते तसेच हाडे चांगली राहण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असतेच; परंतु कॅल्शियम जर याेग्य प्रमाणात असेल तर रक्तदाबही नियंत्रणात राहताे.
वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत हाडांची वाढ हाेत असते.
चाळीशीच्या सुरुवातीला हाडांची झीज व्हायला सुरुवात हाेते.
कॅल्शियममुळे दातही चांगले हाेतातच.
शरीराच्या वजनाचा 1.5 टक्के भाग कॅल्शियमने व्यापलेला असताे.
हाडे आणि दातांमध्ये 99 टक्के कॅल्शियम असते.
बाकी 1 टक्का कॅल्शियम इतर शरीरात असते.
आपल्या शरीरासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचे असते.
दूध, चीझ, दही, पनीर, साेया मिल्क यातून भरपूर कॅल्शियम मिळत असतं.
तीळ, राजमा, नाचणी, साेयाबीन, उदीड डाळ, मूगडाळ, चवळी, मसूर, यात कॅल्शियम असतं.
अंजीर, खजूर, बदाम, जरदाळू यात कॅल्शियम असतं.
भेंडी, पालक, खाेबरे, कांदा, काेबी, लाल भाेपळ्याच्या बिया, शेवग्याच्या शेंगा यातून कॅल्शियम मिळू शकतं.
संत्री, किवी, मलबेरी या फळांमध्येही कॅल्शियम असतं.